Guntha kharedi vikri 1 गुंठा जमीन खरेदी करायची आहे, मग असा करा अर्ज

Guntha kharedi vikri तुकडेबंदी कायद्याचा भंग न करता राज्यात 1 गुंठा जमीन खरेदी करता येते, ती कशी करावी अर्ज कसा करायचा नियम काय आहेत जाणून घेऊयात सविस्तर.

Guntha kharedi vikri

Guntha kharedi vikri niyam Maharashtra

राज्यात तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे तर जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे एवढे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेले आहे यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करण्यासाठी निर्बंध आहेत. मात्र या निर्बंधामध्ये काही तरतुदी करून ते निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 14 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम 2024 हे शुद्धिपत्रक आणले आहे.

14 मार्च 2024 च्या या नवीन कायद्यानुसार राज्यामध्ये शेतकऱ्यांना दहा गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचा तुकडा असला तरी तो जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने चार कारणास्तव खरेदी-विक्री करता येणार आहे.

विहिरीसाठी जमीन (Well Utility)

यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला आपल्या विहिरीच्या खोदकामासाठी आवश्यक असलेली जास्तीत जास्त पाच गुंठे जमीन खरेदी करता येणार आहे यासाठी शेतकऱ्याला विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल अर्ज सादर करत असताना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जीएसटी येथे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व विहीर खोदण्यासाठी दिलेली परवानगी जोडणे आवश्यक राहील.

या प्रकारामध्ये शेतकऱ्याला पाच गुंठ्याच्या आतील जमिनीची खरेदी विक्री करत असताना खरेदी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांच्या नावावरती प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र अर्थात दहा गुंठ्यापेक्षा जास्त जमीन असणं आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना विहीर खोदण्याकरता पाच गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री केल्यानंतर त्या जमिनीच्या विक्री खता नंतर सातबारा उतारा वरती इतर हक्कांमध्ये विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशा प्रकारची नोंद केली जाते.

शेत रस्त्यासाठी जमीन (Farm Road)

शेतकऱ्यांना शेत रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीना घेता येणार आहे. एखाद्या शेतीला तहसीलदार यांच्या माध्यमातून रस्ता उपलब्ध करून दिला जात असताना जर दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन खराब होत असेल तर ती जमीन रस्ता मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला विकत घेता येते यासाठी या शेतकऱ्याला या गुंठ्यामधील जमिनीच्या खरेदीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

हा अर्ज केल्यानंतर तहसीलदारांचा अधिकृत अहवाल ज्यामध्ये भूरस्त्याचे सहनिर्देशक जोडण्याची पडताळणी आणि रस्त्याच्या मागणीच्या संदर्भातील अहवाल या सर्व बाबीची पडताळणी करून जिल्हाधिकारी कच्चा नकाशा जमिनीचे भुसन निर्देशांक आणि जवळच्या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचा तपशील पाहून परवानगी देतात.

भूसंपादनानंतर शिल्लक राहिलेली जमीन

या प्रकारामध्ये जर एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी जमिनीचा अधिग्रहण केलं आणि अधिग्रहण केल्यानंतर जर शेतकऱ्याकडे राहिलेली जमीन ही दहा गुंठ्यापेक्षा कमी असेल तर अशा जमिनीचा तुकडा त्या शेतकऱ्याला विकता येणार आहे.

यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे केलेल्या अर्जासोबत शेतकऱ्याला भूसंपादनाचा अंतिम निवाडा अर्थात AWARD किंवा कमी जास्त पत्र KJP जोडावं लागणार आहे.

ग्रामीण घरकूल योजना (Rural Housing Schemes)

या प्रकारामध्ये राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्याला घरकुलासाठी जमीन खरेदी करायची असेल तर ती जमीन खरेदी करता येणार आहे ज्यामध्ये त्या लाभार्थ्याला एक हजार चौरस फुटापर्यंत जमीन खरेदी करण्यासाठी परवानगी दिली जाते.

1 गुंठा जमीन खरेदी साठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागतो अर्ज केल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अर्थात DRDA ने या लाभार्थ्याची लाभार्थी म्हणून नोंद केलेल्या असावी. त्या जमिनीवर निवासी वापर अनुदेय असेल एमआरटीपी कायद्यानुसार विहित रुंदीचा पोच रस्ता त्या जागेपर्यंत उपलब्ध असावा अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी त्या जमिनीच्या खरेदीसाठी परवानगी देतात.

वरील सर्व बाबींकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलेली मंजुरी ही फक्त एक वर्षासाठी वेद असते जर अर्जदारांना विनंती केली तर ती मंजुरी कमाल दोन वर्षासाठी वाढवता येते मात्र या काळामध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार न झाल्यास ती मंजुरी रद्द केली जाते. याचप्रमाणे ज्या कारणासाठी उदाहरणात एखाद्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा रस्त्यासाठी जमीन खरेदी केली असेल आणि त्या व्यतिरिक्त ती इतर कोणत्याही कामासाठी तिचा वापर केल्यास दिलेली मंजुरी प्रारंभापासून रद्द केली जाते.

1 गुंठा जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी शेतकऱ्यांना नमुना 12 नावाचा अर्ज करावा लागणार आहे अर्जाचा नमुना आपल्याला खालील लिंक वरती मिळेल.

https://drive.google.com/file/d/1Si1vzwRA4dA7DnZ5JVx7uSrmDycMfIn6/view?usp=sharingArj Namuna PDF
Guntha kharedi vikri या अर्जासोबत लागणारी कागदपत्र
  1. सहधारकांचे संमतीपत्र (Consent Letter).
  2. जमीन वर्ग-२ (Class-II) ची असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची (उदा. महसूल विभाग) पूर्वपरवानगी.
  3. विहिरीसाठी: GSDA ची NOC.
  4. शेत रस्त्यासाठी: कच्चा नकाशा व प्रतिज्ञापत्र.
  5. जमिनीवर महसुली किंवा दिवाणी न्यायालयात कोणताही मालकी हक्काचा वाद प्रलंबित नसावा (अ असल्यास त्याचा तपशील देणे आवश्यक आहे).