शेतकऱ्यांना अतिवृष्टी सह सर्व कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्र, Farmer ID for Ativrushti Anudan, mahadbt scheme

Ativrushti Anudan, Mahadbt yojana – Farmer ID
देश भरात कृषि विभागाच्यावतीने ॲग्रीस्टॅक ( Agristack farmer id ) या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले ॲग्रीस्टॅक ( Agristack farmer id ) हे एक एकात्मिक मंच ( integrated portal ) असून याद्वारे हवामानाचा अंदाज, पीक सल्ला, बाजारभाव, शासन योजना तसेच कृषि संबंधित विविध माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पीक सल्ला आणि पुर्वसूचना, बाजारभाव व पुरवठा साखळी माहिती, शासनाचे अनुदान, विमा व विविध योजना यांची माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग, डिजिटल नोंदी व शेत व्यवस्थापन यासारख्या सुविधांचा लाभ ॲग्रीस्टॅक च्या माध्यमातून मिळणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना Agristack पोर्टल वर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी केलेली आहे, त्यांची ॲग्रीस्टॅक मध्ये ई-केवायसी पूर्ण झाली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवरील माहितीशी जुळत असल्यास अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी न करता शासकीय मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर वितरीत केली जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झालेली नाही, अशांना प्रचलित पध्दतीने ई-केवायसी करुनच मदत वितरीत करण्यात येणार आहे.
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करावी.
नोंदणी न केलेल्या उर्वरीत शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्लॅटफार्मवर नोंदणीसाठी https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
अशी करा नोंदणी


