ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी योजना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, योजनेचे MahaDBT पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना MahaDBT
महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यांना घरातूनच सहज करता यावी यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाआयटीकडे विशेष पोर्टल निर्मितीचे काम सोपविण्यात आले आहे. महाआयटीची तांत्रिक टीम हे पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच, योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत लवकरच जारी करण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केलेआहे.
अधिक माहितीसाठी ‘१९६२’ वर संपर्क साधा “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेविषयी कोणतीही अधिकृत माहिती, शंका किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी ‘१९६२’या टोल-फ्री कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, आपल्या परिसरातील नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.


