Shetkari Karjmafi 2026- राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

नैसर्गिक आपत्ती सहअनेक कारणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणारी शेतकरी कर्जमाफी योजना; राज्यात शेतकरी कर्जमुक्ती योजना.Shetkari Karjmafi 2026

Shetkari Karjmafi 2026

Shetkari Karjmafi 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

राज्यात गेल्या पाच वर्षापासून अतिवृष्टी दुष्काळ याचबरोबर अनियमित पाऊस गारपीट अशा अनेक साऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वेळोवेळी संकटात सापडत आहे. आपल्या शेतीच्या कामासाठी घेतलेली पीक कर्ज तो यामुळे वेळेत भरू शकला नाही. अशा नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्या शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करून त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे यासाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वी देखील 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजना राबवल्या आहेत. मात्र यानंतरही दुष्काळ अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या दोन्ही कर्जमाफीनंतर ही शेतकरी थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकल्याचं दिसून आला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आली आहे.

काय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना?

राज्यातील एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेली अल्पमुदतीची थकीत असलेली पीक कर्ज तसेच अल्पमुदतीच्या पीक कर्जाच पुनर्गठन फेर पुनर्गटन करून मध्यम मुदतीमध्ये रूपांतरीत झालेली कर्ज या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला तो म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत दोन लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम भरून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे.

तर या नैसर्गिक संकटातही ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक कर्ज विहित मुदतीमध्ये परतफेड केली अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहन पर लाभाची योजना देखील या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. राज्यात बँकेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे थकबाकीदार आहेत.

OTS Scheme एक वेळ समझोता योजना?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्ज दोन लाखापेक्षा जास्त आहेत अशा शेतकऱ्यांना दोन लाखावरील रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे.

याच्या अंतर्गत एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडे मुदल व व्याजासह 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली जी कर्ज असतील ती समाविष्ट केली जाणार आहेत. एक वेळ समझोता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापेक्षा जास्त असलेली रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत ची मुदत दिली जाणार आहे.

प्रोत्साहनपर अनुदान Regular Karjdar Protsahanpar Anudan

जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची विहित मुदतीमध्ये परतफेड करतात अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी 2022-23 2023 24 2024 25 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांमध्ये आपल्या पीक कर्जाची 30 जून पूर्वी किंवा बँकेने दिलेल्या विहित मुदतीमध्ये परतफेड केलेली असावी.

याचप्रमाणे शेतकऱ्याने 2025 26 या वर्षात किंवा 2026 27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असेल तर त्या शेतकऱ्याला विहित मुदतीमध्ये आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली असणं आवश्यक असणार आहे.

या योजनेमध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीच्या अर्थात 2019 च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मध्ये लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांची जर एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 ची थकीत कर्ज असतील तर अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंतची रक्कम असेल तर पूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे मात्र रक्कम जर पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना 31 मार्च 2017 पर्यंत वरील रक्कम भरून 50000 रुपयापर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 निकष

या योजनेच्या लाभासाठी एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेली अल्पमुदत पीक कर्ज किंवा या पीक कर्जाचा पुनर्गठन व फेर पुनर्गठन केल्याने मध्यम मुदतीत बदल केलेली पीक कर्ज समाविष्ट केले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या जमीन धारणेची आठ असणार नाही. शेतकऱ्याची ऍग्री स्टॅग पोर्टल वरती फार्मर आयडी साठी नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे याचप्रमाणे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक राहील.

ही योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच प्राथमिक कृषीपुरवठा संस्थांना देखील लाभो राहणार आहे.

अपात्र

विद्यमान किंवा माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांतील (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे विद्यमान किंवा माजी सदस्य

केंद्र सरकार राज्य सरकार यांचे अधिकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अर्थात महावितरण एमआयडीसी एसटी महामंडळ यांच्याकडे काम करणारे कर्मचारी हे या योजनेसाठी 25000 पेक्षा जास्त वेतन असेल तर अपात्र राहतील. इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती या कर्जमाफी योजनेमध्ये अपात्र असेल याचप्रमाणे मासिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड तसेच सहकारी दूध संघ यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व रु. २५ हजार पेक्षा अधिक एकत्रित वेतन असलेले कर्मचारी. मात्र, सहकारी साखर कारखान्यांतील हंगामी कामगार या अपात्रतेतून वगळण्यात आले असून ते योजनेसाठी पात्र राहतील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे या योजनेसाठी साधारणपणे 36000 500 कोटी रुपयांच्या निधीची गरज पडणार असून यापैकी 20 हजार 552 कोटी रुपयाची तरतूद ही पावसाळी अधिवेशना पूर्व आणि मागणे द्वारे करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करून या शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ही बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे तर 31 मार्च 2017 कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे.