Shetkari Karjmukti 2026 राज्यात थकीत कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला वेग. बँकेकडून शेतकरी डाटा संकलन सुरू

Punyashlok ahilyadevi holkar shetkari Karjmukti 2026
या योजनेची प्रभावी आणि पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत या योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी बँका यांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या प्रक्रिया पार पाडल्या जात असताना कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हास्तरावरती विशेष नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आलेला असून सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून ती शासनाच्या पोर्टल वरती अपलोड करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर ती समन्वयकाची जबाबदारी ही बँकांवरती निश्चित करण्यात आलेले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक बँकेने मुख्यालय स्तरावरती दोन अधिक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेला असून एक अधिकारी योजना अंमलबजावणी समन्वयक म्हणून तर दुसरा अधिकारी माहिती तंत्रज्ञान समन्वयक म्हणून काम पाहणार असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समिती यांच्याशी समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र जिल्हा नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक बँकांना देण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत लाभ देत असताना पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी कर्ज खात्यांचे दोन स्वतंत्र गटांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. यामधील पहिली वर्गवारी असणारे आधार नंबर उपलब्ध असलेली कर्ज खाते आणि दुसरा वर्ग असणारे आधार क्रमांक उपलब्ध नसलेली कर्ज खाती.
या गोळा करण्यात येणाऱ्या माहितीमध्ये ज्या खात्यामध्ये आधार क्रमांक उपलब्ध नाही अशा खात्यांची स्वतंत्र यादी तयार करून ते बँक शाखा विकास संस्थामार्फत गाव पातळीवरती प्रसिद्ध करण्यात येणार असून संबंधित शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मोहिमा राबवून आधार प्रामाणिकरण करण्याचे आवाहन केले जाणार आहे आणि याच्यासाठी बँकेच्या माध्यमातून विशेष आधार जोडणी मोहीम राबवण्याच्या सूचना देखील बँकांना देण्यात आलेले आहेत.
याचप्रमाणे आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्ज खात्याची माहिती शासनाने तयार केलेल्या नमुन्यानुसार पोर्टल वरती तातडीने अपलोड करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आलेले असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेली वैयक्तिक व संयुक्तिक कर्ज खाते यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. जी कर्ज खाती सामायिक असतील अशा कर्ज खात्यासाठी सर्व कर्जदारांचे आधार क्रमांक आधार जोडलेली बचत खाते तसेच प्रत्येकाचा कर्जातील हिस्सा नमूद करणं बंधनकारक राहणार आहे.
याच प्रमाणे जे कर्जदार मयत असतील अशा कर्जदाराच्या वारसाच्या नोंदी करून त्यानुसार लाभ वितरित करण्यात येणार आहे यासाठी मयत कर्जदारांच्या वारसांना आपली माहिती बँकांमध्ये सादर करण्याचा आव्हान देखील सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
या कर्जमुक्ती योजनेच्या सर्व प्रक्रिया पार पाडत असताना कर्ज खात्याची माहिती अपलोड करण्यासाठी पोर्टल वरती निकष देण्यात आलेले आहेत या पोर्टल वरील निकषाचा पालन करणे बँकांना बंधनकारक असणार आहे यामध्ये त्रुटी आढळल्यास माहिती दुरुस्त करून ती माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहे आधार क्रमांक असलेल्या खात्याची माहिती प्रथम अपलोड केली जाईल आणि त्यानंतर आधार जोडणी झालेल्या खात्याची माहिती पुढील टप्प्यात स्वीकारली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत संकलित केलेल्या माहितीची पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर गावनिहाय लाभार्थी यादी पोर्टल वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही यादी बँक शाखा विकास संस्थांच्या नोटीस बोर्ड या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर या यादीमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेच्या शाखेमध्ये उपस्थित राहण्यासाठीचे संदेश पाठवले जाणार आहेत.
या यादीनुसार पात्र झालेल्या शेतकऱ्यांना यादीतील माहिती बाबत काही हरकत असल्यास ती हरकत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे करता येणार आहे आणि यानुसार समितीच्या निर्णयानुसार जर काही याच्यामध्ये दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून शेतकऱ्यांची कर्जमाफीची Shetkari karjmafi प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
या प्रक्रिये अंतर्गत शेतकऱ्यांचं आधारित प्रामाणिकरण पूर्ण झाल्यानंतर व्यापारी बँकांच्या लाभार्थ्याच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची थेट रक्कम जमा केली जाईल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 48 तासाच्या आत संबंधित नोंदी अध्यायावत करून पोर्टल वरती माहिती नोंदवणं आवश्यक राहील कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देखील दिल जाणार आहे.
अशा प्रकारच्या या कर्जमाफीच्या ( Shetkari karjmafi )लाभासाठी प्रक्रिया पार पाडल्या जाणार असून या प्रक्रियेसाठी डाटा संकलनाचं काम आता बँकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला असून या कर्जमाफीच्या प्रक्रिया युद्ध स्तरावरती पार पाडण्याचे सर्व बँकांना निर्देश देण्यात आलेले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांचा डेटा विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना यादीत स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात येणार असून ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाइन पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात येणार . आधार प्रमाणीकरण आणि मोबाईल क्रमांक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून थेट संबंधित शेतकरी बांधवांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केली जाणार आहे .लवकरच थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल.


