राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजनेअंतर्गत पशुपालकांना कुक्कुटपालन योजनेसाठी ( Kukkutpalan Scheme ) अनुदान, जाणून घेऊयात काय आहे कुक्कुटपालन अनुदान योजना, अनुदान किती, लाभार्थी पात्रतेचे निकष काय सविस्तर.

Kukkutpalan Scheme mukhyamantri gramin pashudhan udyojakata vikas
राज्यात 9 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
कुकुट पालनासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या अंतर्गत तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे याच्यामध्ये पहिली योजना आहे अंडी देणाऱ्या सुधारित कुकुट किंवा देशी पक्षांचे वाटप
Kukkutpalan Scheme अंडी देणाऱ्या सुधारित कुकुट किंवा देशी पक्षांचे वाटप
अंडी देणाऱ्या सुधारित कुबोट किंवा देशी पक्षाचे वाटप या योजनेअंतर्गत किमान 200 अंडी देणारे 5000 एकदिवसीय पक्षी त्यांच्या एक महिन्याच्या खाद्यावरील खर्च या पक्षासाठी अर्धबंदिस्त किंवा पिंजरा किंवा गादी पद्धतीने शेड खाद्य पाणी आणि साठी भांडी अंडी ठेवण्याकरता ट्रे एकनिष्ठ ऑटोमेशन प्रणाली व तीन किलोमीटर सोलर अशा प्रकारच्या बाबी वर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
Beneficiary Eligibility मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना
अंडी देणाऱ्या सुधारित कुकुट किंवा देशी पक्षांचे वाटप या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अर्थात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
कुक्कुटपालनासाठी राबवल्या जाणाऱ्या अंडी देणाऱ्या सुधारित कुकुट किंवा देशी पक्षांचे वाटप या अनुदान योजनेअंतर्गत अत्यल्पभूधारक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी वन हक्क धारक सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी अशा प्राधान्यक्रमाने लाभ दिला जाणार आहे.
कुक्कुटपालन अनुदान या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांकरता 50 टक्के आरक्षण असणार आहे तर दिव्यांग लाभार्थ्यासाठी 5% आरक्षण राखीव ठेवण्यात आलेला आहे आरक्षणा नुसार जर पुरेशी अर्ज प्राप्त झाले नाहीत तर महिला लाभार्थ्यांच्या 50% आरक्षणाऐवजी इतर घटकातील लाभार्थ्यांना लाभ दिल्या जाणार आहे.
Kukkutpalan Scheme Project Cost
कुक्कुटपालन अनुदान योजनेअंतर्गत २०० अंडी उत्पादन देणारे 5000 एकदिवशीय पक्षी ज्यांची किंमत प्रतिपक्षी पन्नास रुपये याप्रमाणे ग्राह्य धरले जाईल आणि यासाठी अडीच लाख इतका प्रकल्प खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे. याचप्रमाणे या पाच हजार पक्षाच्या खाद्यावरील खर्च तीन किलोग्रॅम प्रतिपक्षी याप्रमाणे व 30 किलो 30 रुपये प्रति किलोग्राम नुसार चार लाख 50 हजार इतका ग्राह्य धरला जाईल
कुकुट पक्षासाठी अर्धबंदिस्त किंवा पिंजरा किंवा गादी पद्धतीने शेड बांधकाम यासाठी 15 लाख रुपये धान्य पाणीपुरवठा भांडी अंडी ठेवण्याकरता ट्रे एकनिष्ठ ऑटोमेशन इत्यादीसाठी सहा लाख 68 हजार रुपये तर तीन किलोमीटर सोलर साठी एक लाख बत्तीस हजार रुपये असा एकूण या योजनेसाठीचा प्रकल्प खर्च हा 30 लाख रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे.
Kukkutpalan Scheme Subsidy
कुक्कुटपालन अनुदान या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे लाभार्थी जर सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्या लाभार्थ्याला 50% अर्थात 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थी असतील तर त्यांना 75 टक्के अर्थात 22 लाख 50 हजार रुपयापर्यंत अनुदान दिल्या जाणार आहे
कुक्कुटपालन अनुदान या योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण हे दोन टप्प्यात केले जाईल पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्के अनुदान हे लाभार्थ्यांना शेड निर्मिती केल्यानंतर लाभार्थ्याला दिले जाणार आहे तर लाभार्थ्यांना कुकुट पक्षाची खरेदी साधनसामग्रीची खरेदी आणि प्रत्यक्षात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
Kukkutpalan Scheme Documents
कुक्कुटपालन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये लाभार्थ्याचे कुक्कुटपालन व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा कुकूटपालन व्यवसायातील किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहे.
लाभार्थ्याचे आधार कार्ड लाभार्थ्याच्या शेतजमिनीचा सातबारा आठ जर जमीन भाडेपट्ट्यांना असेल तर भाडेपट्टा करार ही कागदपत्र देखील लागतील मात्र लाभार्थी जर वन हक्क धारक असेल तर त्या लाभार्थ्याला ही कागदपत्र लागणार नाहीत मात्र सातबारा उतारा वरती इतर अधिकार मध्ये लाभार्थ्याची नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे
लाभार्थी जर दिव्यांग असेल तर त्याला आभार त्याला प्रमाणपत्र अर्थात यु डी आयडी कार्ड द्यावे लागेल महिला बचत गटातील सदस्य जर या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर महिला बचत गटाच्या सदस्यत्व प्रमाणपत्र लागणार आहे.
या योजनेअंतर्गत 50 टक्के प्रकल्प खर्च हा लाभार्थ्याला स्वतः तयार करायचा असतो आणि यासाठी योजनेच्या कागदपत्रांमध्ये या प्रकल्पासाठी बँकेची कर्ज मंजुरीची सहमती अर्थात बँक लोन सॅमसंग लेटर सुद्धा द्यावं लागणार आहे.
Kukkutpalan Scheme Terms & Conditions
योजनेसाठीच्या अटी शर्तीमध्ये या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणारे कुकुट पक्षी हे किमान 200 अंडी देणारे असावेत देशी पशुपक्षी खरेदी करताना शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरील प्रक्षेत्र राष्ट्रीय पशुधन अभियान दर्ग स्थापित कुकुट प्रकल्प यांच्याकडून ती घ्यावी पात्र लाभार्थ्याने त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन यांना कळवलेल्या दिनांक पर्यंत म्हणजेच दोन महिन्याच्या आत कुक्कुटपालनासाठी शेडची उभारणी करावी
यानंतर पुढील एक महिन्यात लाभार्थ्याने पश्चिम खाद्य पाण्याची भांडी सोलर इत्यादी मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्ष कुकूटपालन सुरू करावे जर एखाद्या लाभार्थ्यांना विहित कालावधीमध्ये कुक्कुट पक्षाची खरेदी केली नाही किंवा कुक्कुटपालन सुरू केले नाही तर अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवून पुढील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जातो.


