Dudh anudan 2024 साठी अर्ज करण्यास ही असणार शेवटची तारीख

शासनाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले 5 रूपये प्रति लिटर अनुदान मिळविण्यासाठी दूध संघाला अर्ज करण्यास मुदत जाहीर. Dudh anudan 2024

Dudh anudan 2024

Dudh Anudan 2024 application

सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.शासनाने जाहीर केलेल्या 5 रुपये प्रतिलिटर दुधाच्या अनुदान ( Dudh Anudan 2024 ) योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी दुध संघांनी व खाजगी दुध प्रकल्पांनी विहीत नमुन्यात अर्ज आयुक्त,दुग्धव्यवसाय विकास विभाग,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे.

तरी या अनुदान ( Dudh anudan 2024 scheme ) योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी डीबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी ( Ear Tag ) संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे.

Dudh anudan 2024 योजनेत जे दुध उत्पादक शेतकरी सहकारी दुध संघास व खाजगी प्रकल्पास दुध पुरवठा करतात,ते शेतकरी सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पामार्फत सहभागी होवू शकतात.या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी आपला स्वतंत्र अर्ज संपूर्ण माहितीसह ddcmaharashtra@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार दुधाचे अनुदान | milk subsidy 2024

पशुपालकांनी आपल्या पशुधनास टॅगींग व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. दुध उत्पादक शेतकऱ्यांना दि. 5 जानेवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार गाय दुधासाठी प्रती लिटर पाच रुपये अनुदान देय आहे. पात्र पशुधनास कानात टॅगींग करुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी करणे अत्यावशक आहे.

त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुधनास टॅगींग व भारत पशुधन प्रणाली वर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

मा. पशुसंवर्धन मंत्री यांनी दि. 24 जानेवारी, 2024 रोजी व्हिसीद्वारे घेतलेल्या बैठकीत सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांना पशुधनास टॅगींग व भारत पशुधन प्रणाली वर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविणे बाबत सूचित केले आहे.

त्यामुळे सर्व पशुपालक, शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पशुधनास टॅगींग व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करुन आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी,

Watch this also 👇

Milk prices 2023 GR Maharashtra

राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत दूध उत्पादक, सहकारी व खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दि. २२.६.२०२३ रोजी मा.मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास) यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत दूध उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी यांनी दूधाच्या दरामध्ये milk prices मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे, असे नमूद केले.

राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संघांकडून करण्यात येते. दुधाच्या कृश काळात दूध उत्पादन कमी असल्याने, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळतो. तथापि, दुधाच्या पुष्ट काळात दूध उत्पादन वाढल्याने, विविध खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्विकारले जाते. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.

वरील सर्व बाबी लक्षात घेता, खाजगी/ सहकारी दूध संघांचा परिचालन खर्च (Operating Cost) तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला किमान भाव मिळावा यानुषंगाने दूधाचे दर निश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

dudh dar

या समितीची दर ३ महिन्यांनी बैठक होईल व राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दूधाला (३.५/८.५) व म्हशीच्या दूधाला (६.०/९.०) दिला जाणारा किमान दूध दर (Minimum Rate Cap) निश्चित केला जाईल.

समितीच्या बैठकीत निश्चित होणाऱ्या दूध दरास milk prices आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांनी शासनाची मान्यता घ्यावी.

सदर किमान दूध दर कोणतीही कपात न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना देणे हे राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्थांना बंधनकारक राहील.

समितीस वरील सदस्यांव्यतिरीक्त एखाद्या विशिष्ट प्रकरणी तज्ञांच्या अभिप्रायाची आवश्यकता असल्यास, समितीस सदर व्यक्तीस / अधिकाऱ्यास निमंत्रित करण्याची मुभा राहणार आहे.

हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या खालील लिंक वर पाहू शकता.

GR PDF Link www.maharashtra.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *