हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू | CCI Cotton msp 2024

राज्यात ठिकठिकाणी सीसीआय ची कापूस हमीभाव खरेदी केंद्र सुरू, केंद्रावर कापूस विक्रीचे शेतकऱ्यांना आवाहन Cci cotton msp

CCI Cotton msp

CCI Cotton msp purchase center

परभणी – Parbhani msp cotton purchese center

कापूस पणन महासंघाच्या परभणी विभागातील कापूस उत्पादक शेतक-यांनी परभणी जिल्ह्यात सेलु, ताडकळस, मानवत, सोनपेठ, जिंतुर, बोरी तर हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार व वसमत नगर अशा एकूण 8 कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. तसेच याव्यतिरीक्त सीसीआयमार्फत परभणी जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पाथरी, व हिंगोली जिल्ह्यात हिंगोली या 4 केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतक-यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करण्याचे आवाहन प्र. विभागीय व्यवस्थापक बि.व्ही. जाधव यांनी केले आहे.

यवतमाळ – Yavatmal msp cotton purchese center

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील सात केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरिक्त दिग्रस, महागांव व यवतमाळ या तीन केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे, असे कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, घाटंजी, राळेगांव, वणी, खैरी, सिंदोला आणि पांढरकवडा या सात कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. या व्यतिरिक्त सीसीआयमार्फत जिल्ह्यातील दिग्रस, महागांव व यवतमाळ या तीन केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे.

अमरावती – Amaravati msp cotton hamibhav kharedi kendra

अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे व येवदा दर्यापूर येथील कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळमार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू आहे. तसेच याव्यतिरिक्त सीसीआयमार्फत जिल्ह्यातील चांदुर बाजार, दर्यापूर, वरूड व भातकुली या चार प्रास्तावित केंद्रांवर किंमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या खरेंदी केंद्रावर विक्री करावा, असे आवाहन प्र. विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.

नांदेड – Nanded kapus hamibhav kharedi kendra

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा अशा एकूण 5 कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरीक्त सी.सी.आय.मार्फत नांदेड जिल्ह्यात भोकर या 1 केंद्रावर किमान हमीदराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. कापूस पणन महासंघाच्या नांदेड विभागातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्र. विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.

चंद्रपूर – Chandrapur cotton MSP

भारतीय कापूस महामंडळामार्फत जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर एफ.ए.क्यु. प्रतीच्या कापसाची किमान हमीदराने कापूस खरेदी सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, सोनुर्ली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील खैरी, पांढरकवडा, सिंदोला, वणी अशी एकुण 8 कापूस खरेदी केंद्रे आहेत. तसेच सीसीआयमार्फत चंद्रपूर आणि वरोरा या दोन केंद्रावर किमान हमीदराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरू आहे. तरी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक कागदपत्रांसह सीसीआय च्या नजीकच्या केंद्रावर विक्री करावा, असे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक श्री. दुहीजोड यांनी कळविले आहे.

बुलडाणा – Buldhana msp cotton

कापूस पणन महासंघाच्या खामगाव विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चिखली, खामगाव, खामगाव-बी, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा या 5 कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळामार्फत एफएक्यू प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु झाली आहे. तसेच सीसीआयमार्फत जिल्ह्यात जळगाव जामोद आणि शेगाव या 2 केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी center उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन खामगाव येथील विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.

अकोला, वाशिम – AKOLA cci cotton hamibhav center

भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) विभागातील 10 केंद्रांवर एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांनी सीसीसीआयच्या नजिकच्या केंद्रावर कापूस विक्री करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळामार्फत अकोला जिल्ह्यात अकोट, अकोट ब, बार्शिटाकळी, चिखलगाव, हिवरखेड, मूर्तिजापूर, पारस, तेल्हारा व वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर व अनसिंग अशा 10 केंद्रावर खरेदी सुरू आहे. त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे चोहोट्टा बाजार येथेही केंद्र उघडण्यात येत आहे, अशी माहिती पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली.

जालना – Jalana cci cotton center

भारतीय कापूस पणन महामंडळाने (सीसीआय) चालु वर्षात जालना जिल्ह्यात हमी भावाने कापूस खरेदी जालना, बदनापूर, भोकरदन, राजूर, घनसावंगी, शहागड, मंठा आणि परतूर या केंद्रावर खरेदी सुरु आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या जवळील भारतीय कापूस पणन महामंडळाच्या केंद्रावर विक्री करावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक अजय गिरमे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातंर्गत जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जालना जिल्ह्यात एकुण 8 कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) एफ.ए.क्यु. प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु केली आहे. असे विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: