शेतकऱ्यांना होणार या बियाण्यांचे मोफत वाटप | Biyane anudan yojana 2022

पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना २०२२ अंतर्गत शेतकऱ्यांना होणार मोफत बियाण्यांचे वाटप ( Biyane anudan yojana 2022 ), पहा सविस्तर कोण असतील लाभार्थी, कोणते बियाणे मिळणार.

Biyane anudan yojana 2022

‘पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना सन 2022-23’ Biyane anudan yojana 2022

कृषिप्रधान संस्कृतीचा शेतकरी हा कणा आहे. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यस्थेचा शेतकरी आधार आहे. मात्र सर्वांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या शेतकरी बांधवांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.

त्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची शासनाने काळजी घेतली आहे. कृषी विभाग ( Agriculture department Maharashtra )आता शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे वाण मोफत ( Biyane anudan ) देणार आहे. यामुळे पोषणमूल्यांची गरज भागण्यास मदत होणार आहे. ‘आत्मांतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना 2022-23’ च्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य ठरले आहे.

शेतकऱ्यांना विषमुक्त सुरक्षित अन्न ( Healthy food for farmer )

शेतकरी कुटुंबाला भाजीपाला,( Vegetable seed ) कडधान्य बीयाणे ( cereals seed ) कीट पुरवठा करून त्यांची लागवड केल्यास त्यातून येणाऱ्या पोषणमूल्यांची गरज भागविता येऊ शकते.

पोषणमूल्य असणाऱ्या वाणांची लागवड करून त्यातून येणाऱ्या भाज्या, कडधान्यांचा शेतकरी कुटुंबाने स्वत:च्या आहारात  वापर करायचा आहे. आपण स्वत: लागवड केलेल्या शेतात किड रोगांसाठीच्या विषारी औषध फवारण्याचे प्रमाण मर्यादित ठेऊन किंवा पूर्णता टाळून विषमुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकते.

Scheme Beneficiary

Biyane anudan yojana maharashtra 2022 या योजनेसाठी 50 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून गावातील कुपोषित बालके असलेल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

गावातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून उर्वरित लाभार्थी आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट,महिला बचत गटातील असणार आहेत. ग्राम कृषी विकास समितीच्या मान्यतेने लाभार्थी अंतिम करण्यात येणार आहेत.

शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना पोषणयुक्त व सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, संतुलित अन्नाचा पुरवठा करणे, विषमुक्त सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, ग्रामीण भागातील पोषणमूल्याअभावी होणारे कुपोषण कमी करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सुरूवातीला प्रत्येक गावात 10 किट देण्यात येणार आहेत. त्यांनतर टप्प्याटप्प्याने कीट ( Seed kit ) देण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. डीपीसी, सीएसआर, पंचायत समिती सेस, जिल्हा परिषद सेस, फलोत्पादन विभागाची परसबाग योजना यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. आत्माचे प्रकल्प संचालक यासाठी प्रयत्नशिल आहेत.

Type of Seeds for supply

या योजनेसाठी भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर या बियाणांचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. हे बियाण्यांचे किट ( Seed Kit ) एक गुंठ्यासाठी पुरेसे असून एका शेतकरी कुटुंबाची दैनंदिन गरज भागू शकणार आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे बँक तयार करून स्वत: वापरून इतरांनाही बियाणे द्यावयाचे आहेत. या बियाणांच्या लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी येणाऱ्या बिया पुढच्या वर्षी वापरायचा आहेत. या बीयाण्यांचा पुरवठा महाबीज करणार असून गुणवत्तेची जबाबदारी महाबीजची आहे.

लागवड

या बियाण्यांच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जागा निवडावी. जागा शक्यतो राहत्या घराजवळ जागा असावी, जणेकरून देखरेख करणे सोईचे होईल. लागवड करताना मशागत करून माती भुसभुशीत करून शेणखत टाकावे.

पालेभाज्यांसाठी गादी वाफे तयार करावेत. फळभाज्यांसाठी सरीवरंबे, हंगामानुसार येणाऱ्या पिकांची लागवड करावी. भाजापाल्याचे आहारातील महत्व, लागवड, जोपासना, कीड व रोग, बीयाणे बँक यासाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे पोषणमान उंचावणार असून शेतकरी कुटुंब रोगमुक्त जीवन जगू शकणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *