खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर | Antim Paisewari 2023

अखेर प्रतीक्षा लागलेली अंतिम आनेवारी जाहीर करण्यास सुरुवात जालना जिल्ह्याची Antim Paisewari 2023 50 पैशा पेक्षा कमी, दुष्काळावर शिक्कामोर्तब.

Antim Paisewari 2023

सन 2023-24 या वर्षाच्या खरीप हंगामात खरीप गावांची तसेच ज्या रब्बी गावांत दोन तृतीयांश (2/3) पेक्षा जास्त खरीपात पेरणी केलेली आढळली आहे, त्या गावांची पैसेवारी देखील खरीप हंगामात जाहीर करण्यात करण्यात आली आहे.

त्यानुसार जालना जिल्हयाच्या आठ तालुक्यातील खरीप पिकांच्या सुधारीत अंतिम पैसेवारीमध्ये खरीप गावे एकूण 515 व रब्बी गावे 456 आहेत. अशा एकूण 971 गावांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून जिल्हयातील 971 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. तर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुका – 151 गावे, बदनापूर-92, भोकरदन-157, जाफ्राबाद-101, परतूर-97, मंठा-117, अंबड-138, घनसावंगी-118 गावे. परतूर तालुक्यातील एकूण 98 गावांपैकी राणी वाहेगाव हे एक गाव बुडीत क्षेत्रात गेलेले असल्यामुळे 97 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: