Annasaheb patil karj yojana 2023
ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात,आता तरुणांना व्यवसायासाठी १५ लाख कर्ज
annasaheb patil karj yojana 2023 limit increased
राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवक युवतींना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्याकरता विविध योजना राबवल्या जातात.
याच योजनांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनण्याकरता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाख करण्यात आलेली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून ( Annasaheb patil karj yojana 2023 ) गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना राबवली जात असून आर्थिक मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार युवकापर्यंत त्या योजना पोहोचवून त्यांना सक्षम बनवणं, या योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणं अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण उद्देश घेऊन ही योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात.
याच्याच अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा आता दहा लाखावरून पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात
महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरु करण्याची कार्यवाही केली आहे. येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉट टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून १० हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय दौरे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार-प्रसिध्दी करण्यात येत आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरु करुन त्याचा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत पत्रव्यवहार करुन, ही बाब उपसमितीमध्ये देखील मांडली. ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून, महामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्न करुन ट्रॅक्टर प्रकरणे सुरु करण्याकरिता कार्यवाही केली असल्याचे सांगितले.
मराठा समाजातील नवोद्योजकांना हात देण्यासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 2 फेब्रुवारी 2018 रोजी गेलेली आहे.
महामंडळाकडून तरुणांना उद्योगासाठी व्याज परतावा दिला जातो पूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांची कर्ज लाभार्थ्यांना दिली जात असत त्यावर तीन लाख रुपयापर्यंत व्याज परतावा दिला जात होता. मात्र आता नवीन नियमानुसार 20 मे 2022 पासून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 15 लाख रुपये कर्ज दिले जात असून या कर्जावर साडेचार लाख रुपयांचा व्याज परतावा दिला जात आहे.
या योजनेच्या कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अपेक्षित आहे.
याच्यासाठी https://udyog.mahaswayam.gov.in/#/home या संकेतस्थळावरती योजना निहाय ऑनलाईन नोंदणी करावी लागते.