वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृतास आता 20 लाखाची आर्थिक मदत | vanyaprani nuksan

आता वन्यप्राण्यांच्या हल्यात व्यक्ती वा पशू मृत झाल्यास, जखमी झाल्यास दिल्या जाणाऱ्या मदतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. Vanyaprani nuksan

vanyaprani nuksan

vanyaprani nuksan Bharpai

महाराष्ट्र राज्यात वन विभाग करीत असलेल्या वन्यजीव संवर्धनामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत लक्षनीय वाढ झालेली आहे.

परिणामी मानव वन्यजीव संघर्षात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनालगत असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्यात येते.

वनालगत च्या गावातील नागरिकांचे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसारख्या ( dr shyama prasad mukherjee jan van yojana ) योजनाद्वारे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.

मात्र हे सर्व करत असताना सुध्धा सन 2019-2020, 2020 21, 2021 22 23 या वर्षांमध्ये वन्यजीवांच्या हल्यामुळे ( vanyaprani nuksan ) अनुक्रमे 47, 80 व 86 इतक्या मनुष्यहानीच्या घटना घडल्या आहेत.

मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे होणारे अतोनात नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस कोल्हा, मगर, हत्ती, व रान कुत्रे यांच्या हल्ल्यामुळे ( vanyaprani nuksan ) होणारे मनुष्यहानी व पशुधन आणि प्रकरणी देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या साठी वनविभाग शासन निर्णय हा 23 ऑगस्ट 2022 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय येथे पाहा 👇

वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत.

या शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांच्या हल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसाहयात आता रुपये पंधरा लक्ष वरून वीस लक्ष अशी वाढ करण्यात आली आहे.

तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय म्हैस बैल याचा मृत्यू झाल्यास 60000 वरून ही रक्कम 70000 रुपये करण्यात आली आहे.

तसेच मेंढी बकरी व इतर पशुधन याचा मृत्यू झालास दिली जाणारी मदत आता दहा हजार वरून पंधरा हजार करण्यात आली आहे.

याचप्रमाणे म्हैस बैल यांना कायम अपंगत्व आल्यास दिली जाणारी मदत ही बारा हजारावरून 15000 रुपये करण्यात आली आहे.

तसेच काय म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास चार हजार वरून पाच हजार एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. vanyaprani halla madat

विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’ला लोकचळवळीचे स्वरूप आले असून लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते नायर रुग्णालयांतर्गत नव्याने सुरू झालेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन (ईआयआरसीसी) केंद्राचे रविवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार रईस शेख, आमदार श्रीमती यामिनी जाधव, vanyaprani nuksan आमदार कालिदास कोळंबकर, ॲड.मनीषा कायंदे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, यशवंत जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, डॉ.सुधाकर शिंदे, उपायुक्त रमाकांत बिरादार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’अंतर्गत आज वरळी येथील vanyaprani nuksan डॉ.हेडगेवार चौक, आचार्य अत्रे चौक, माता रमाई आंबेडकर चौक, नायगाव येथील महाराणा प्रताप चौक, तसेच नायगाव बीडीडी चाळ परिसरातील गांधी चौक येथे स्वच्छतेच्या सुरू असलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून त्यात स्वतः सहभाग घेतला.

मुलांसाठी प्रारंभिक उपचार केंद्राच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणाले, हे केंद्र खाजगी उपचार केंद्रापेक्षा चांगले असून महानगरपालिका किती चांगले काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेष मुलांच्या गरजाही विशेष असतात, त्यांची पालकांना काळजी असते. तथापि या केंद्राच्या माध्यमातून अशा मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार असून अशी दोन केंद्रे मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तर एक केंद्र ठाण्यामध्येही सुरू करण्यात येईल. प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान असल्याचे सांगून येथे मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता दर आठवड्याला विविध प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री स्वत: या मोहिमेत सहभागी होत आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. यामुळे मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली असून स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत.

या माध्यमातून आजुबाजूच्या प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन, एअर प्युरिफायर, मिस्ट मशीन अशा आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, रत्यांवरील माती काढणे, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणे, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणे ही कामे केली जात आहेत. यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेमुळे नियमित सफाईची कामे करणे सोयीचे होत असून याचे दृश्य परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत असून सुशोभिकरणाची कामे वेगाने होत आहेत. प्रत्येक चौकात झाडे लावणे, अर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरीत क्षेत्र वाढविणे ही कामे केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: