माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी, शासनाचा नवा उपक्रम | Scheme for farmer Maharashtra

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी, पहा काय आहे नेमका हा उपक्रम. Scheme for farmer majha ek divas majhya balirajasathi

Scheme for farmer

Scheme for farmer Maharashtra majha ek divas majhya balirajasathi

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी majha ek divas majhya balirajasathi )असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे याच्या संदर्भातील एक महत्त्वाच परिपत्रक 25 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या काढण्यात आलेले आहे.

हा उपक्रम कशाप्रकारे राबवला जाणारे कशासाठी राबवला जाणार आहे, शेतकऱ्यांचे काय फायदे होतील या सर्वांबद्दल सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यांमध्ये शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्या अडचणीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येतं यात प्रामुख्याने मराठवाड्याने विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात.

बऱ्याच साऱ्या शासनाच्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात परंतु या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही त्याचे लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाहीत, अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क होऊ शकत नाही बरेच सारे योजनांचे लाभार्थी यांना योजनेबद्दल समस्या असतात.

बरेच शेतकरी त्यांच्या माध्यमातून विविध पीक पिकवतात परंतु त्याच्याबद्दलचा अधिकच तंत्रज्ञान त्यांना माहीत होत नाही त्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्या पीक पद्धतीमधील बदल असतील नवीन पद्धती असतील या सर्वांबद्दल शेतकऱ्यांना ज्ञान मिळत नाही.

आणि हे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या शेतामध्ये मिळावं याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक काढून आता माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यास मंजुरी दीली आहे.

या उपक्रमाची सुरुवात ही एक सप्टेंबर 2022 पासून करण्यात येणार आहे जी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत राज्यांमध्ये राबवली जाईल.

या उपक्रमांमध्ये त्या भागामधील खासदार आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधी सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सहभागी होत येणार आहे.

माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमामध्ये सहभागी होणारे अधिकारी.

राज्यस्तर अधिकारी

प्रधान सचिव कृषी आयुक्त कृषी संचालक

विद्यापीठ स्तरावर कृषी विद्यापीठांचे कुलगुरू विद्यापीठांचे विभाग प्रमुख कृषी विद्यालय यांच्या अधिष्ठाता

विभाग स्तरावर

विभागीय आयुक्त विभागीय कृषी सहसंचालक जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी याचप्रमाणे प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रकल्प संचालक आत्मा आणि इतर जिल्हास्तरीय अधिकारी.

विभागीय स्तर आधिकारी मध्ये उपविभागीय अधिकारी, महसूल उपविभागीय अधिकारी, कृषी उपविभागीय स्तरीय अधिकारी

अशाच प्रमाणे तालुकास्तरीय अधिकारी मध्ये तहसीलदार आणि इतर तालुकास्तरीय अधिकारी हे अधिकारी या ठिकाणी या उपक्रमाच्या अंतर्गत सहभागी होऊ शकतील.

या उपक्रमामध्ये वरील उल्लेखित केलेले जे अधिकारी असतील ते अधिकारी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस या गावांना भेटी द्यायच्या आहेत.

या उपक्रमाच्या अंतर्गत ज्या आधिकाऱ्यांना या ठिकाणी उपक्रमामध्ये भेट द्यायचे अशा गावाची निवड करताना दुर्गम डोंगराळ कोरडवाहू आदिवासी सामाजिक आणि दुर्बल असे क्षेत्र असणाऱ्या गावांची निवड करण्यात येणार आहे.

गावाची निवड करताना संबंधित अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयापासून दूरची गाव निवडावेत. गावाची निवड करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांना त्याची गावाची निवड करून द्यावी.

भेट देण्यात यावयाच्या शेतकऱ्यांची निवड करताना शक्यतो कोरडवाहू शेतकऱ्यांचे निवड करावी अशा प्रकारची या गावांची आणि शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

उपक्रम कालावधीमध्ये काय काय केलं जाणार आहे याच्यामध्ये आपण जर पहिल्यादा अधिकारी पदाधिकारी यांनी गावाची निवड केल्यानंतर गावातील शासकीय, निम शासकीय अशासकीय संस्था, गावातील बँका , सोसायटी दूध संस्था यांना भेटी देऊन शेतकऱ्यांना त्याच्या संबंधात कसे लाभ दिले जातात कशी मदत दिली जातात याच्या संदर्भातील चर्चा करतील.

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांचे उत्पादन खर्च त्यांची बचत या सर्वांबद्दलची माहिती त्याच्यासोबत चर्चा केली जाईल. विदर्भ मराठवाडा यासारख्या आत्महत्याग्रस्त विभागामध्ये तसेच विभागामध्ये इतर शेतकऱ्यांना येणाऱ्या नैराश्याची कारण शोधली जातील, त्यांना कशामुळे प्रॉब्लेम येतात त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील.

प्रश्न सोडवण्यासाठी काय निर्णय घेता येतील याच्याबद्दल सविस्तर अहवाल तयार केला जाईल. भेट देणाऱ्या गावांमध्ये ग्राम कृषी विकास समितीची बैठक घेऊन त्या गावाच्या पीक पद्धतीमधील बदल करावयाच्या पीक पद्धती बाबत माहिती शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान जाणून घ्यावे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील.

शेतकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा बाबतच्या ज्या योजना( shetkari yojana 2022 ) आहेत उदाहरणार्थ पीएम किसान असेल गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल प्रधानमंत्री पिक विमा योजना असेल नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई जी असेल याबाबतच्या लाभार्थ्याला भेट देऊन त्याच्या समस्या जाणून घेऊन त्याच्याबद्दलची माहिती त्यांना दिली जाणार आहे.

याचप्रमाणे अधिकारी पदाधिकारी यांनी यंत्रेनेमार्फत ज्या विविध योजना ( shetkari yojana 2022 ) राबवल्या जातात त्यांची माहिती शेतकऱ्यांना शेतावरती जाऊन सांगितल्या जातील.

Govt GR PDF Link

shetkari yojana maharashtra 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: