नियमित कर्जदार शेतकऱ्यांना खुशखबर ! लवकरच खात्यात ५०,००० | regular karjmafi anudan

नियमित पने आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी गोड खबर, खात्यात येणार regular karjmafi anudan ५०,०००. शासनाने २५०० कोटी केले वितरीत.

regular karjmafi anudan

regular karjmafi anudan GR

सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन 2022- 23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.

https://youtu.be/Zm6EHd2Wb1k

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याबाबत दिनांक 27- 7- 2022 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सहकार विभागाच्या संदर्भात क्र 1 दिनांक 29 -7 -2022 च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

तसेच सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या दिनांक 2 -8- 2022 च्या शासन निर्णयामुळे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022 23 या वित्तीय वर्ष रु 4700.00 कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या दिनांक 29 -8 -2022 च्या परिपत्रकांवर तसे सहकार विभागाच्या दिनांक 30- 8 -2022 च्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आली आहे.

त्यानुसार याबाबत सहकार आयुक्त कार्यालयाच्या संदर्भातील दिनांक 1/8/2022 च्या पत्राद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार निधी वितरित करण्याची मागणी करण्यात आली होती, आज अखेर यासाठी GR निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णया नुसार सन 2022 23 या आर्थिक वर्षात सहकार पनन वर वस्त्र उद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु 2350.00 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत regular karjmafi anudan प्रोत्साहन पर लाभ योजना स्तरावर कार्यक्रम (24350189),33 अर्थसाह्य या लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे येथे आधीनस्त सहाय्यक निबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

तसेच लेखाधिकारकारी अधिक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना हरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी अशी सूचना ही देण्यात आली आहे.

regular karjmafi anudan शासन निर्णय येथे पाहा 👉👇

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: