शेतकर्यांना 15 सप्टेंबरपर्यंत नुकसान भरपाई अनुदान, तसेच पीक विमा कंपनीकडून pik vima 2022 25% वीमा मिळेल, असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
pik vima 2022
जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळीपर्यंत 900 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई
धाराशिव जिल्ह्यात सन २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे एक लाख 75 हजार हेक्टर वरील पीकांचे नुकसान झाले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार 33 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याने नुकसान ग्रहीत धरून विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून 15 सप्टेंबरपर्यंत अनुदान शेतकर्यांना मिळणार आहे.
तसेच पीक विमा कंपनी कडून खरिप २०२२ मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी 25 % अग्रीम रक्कम देण्यात येईल. अशी माहिती ही या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कडून देण्यात आली आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत 7 टीएमसी पेक्षा अधिक पाणी मिळावे यासाठी संबंधितांची बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे सांगून 7 टीएमसी पाणी कामावरील बंदी उठवली असून डिसेंबर २०२२ पर्यंत हे पाणी धाराशिव जिल्ह्याला मिळेल, असेही ते म्हणाले.