Pik spardha yojana 2023 – योजनेत महत्वाचे बदल

राज्यात विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या Pik Spardha yojana 2023 च्या अमलबजावणी कार्य पद्धतीत बदल, GR निर्गमित

Pik spardha yojana 2023

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.

अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडते, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना Pik Spardha 2023 राबविण्यात येत आहे.

सद्यस्थितीत या योजनेमध्ये पिकस्पर्धेतील पिकांमध्ये अवाजवी उत्पादकता येणे, पिकस्पर्धा निकाल घोषित करणे कामी खुप अवधी लागणे, स्पर्धक शेतकरी पिक कापणीचे वेळी सर्व ठिकाणी अधिकारी हजर राहणे शक्य न होणे तसेच राज्यस्तरीय बक्षीस एकाच वर्षाच्या उत्पादकतेवर अवलंबून असल्याने संबंधित स्पर्धकांच्या उत्पादकतेमध्ये सातत्य आहे किंवा कसे हे न समजणे, अशा अनेक कारणास्तव पिकस्पर्धेमध्ये बदल करण्या बाबतची मागणी क्षेत्रिय स्तरावरुन केली जात होती

यास्तव पीकस्पर्धेमध्ये अधिक पारदर्शकता आणणे, दुय्यम व पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी, पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रचार व प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. या उद्देशाने पिक स्पर्धेच्या यापुर्वीच्या कार्यपध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Pik Spardha yojana 2023 New GR

Download pdf राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धेच्या अंमलबजावणी कार्यपध्दतीमध्ये बदल करण्याबाबत.

पीक स्पर्धेतील हंगाम निहाय पिके

• खरीप पीके -भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल (एकूण ११ पिके)

● रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके)

पीकस्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान १००० हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र १००० हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Pik Spardha yojana 2023 स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या

पीक स्पर्धेसाठी तालुकास्तरासाठी तालुका, जिल्हास्तरासाठी जिल्हा व राज्यस्तरासाठी राज्यातील सर्व जिल्हे हे घटक आधारभूत धरण्यात येईल.

किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ (यापेक्षा कमी स्पर्धक संख्या असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी / जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी संबंधित पिकाची त्या वर्षाकरीताची पिकस्पर्धा रद्द केली जाईल )

पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली भात पिकासाठी किमान २० आर व इतर पिकासाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

तालुकास्तरीय स्पर्धा तालुका कृषि अधिकारी यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी व राज्यस्तरीय स्पर्धा मा. संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी जाहीर करतील.

पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी०५ व आदिवासी गटासाठी ०४ स्पर्धकांची पीक कापणी होणे आवश्यक आहे. (यापेक्षा कमी स्पर्धकांची पिक कापणी झाल्यास संबंधित पिकस्पर्धा जाहीर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संबंधित पिकाची त्या वर्षाकरीताची पिकस्पर्धा रद्द केली जाईल. )

पिकस्पर्धा प्लॉटची कापणी व मळणी एकाच दिवशी करण्यात यावी.

Pik Spardha yojana 2023 पीक कापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण-

१) तालुकास्तरावरील पिकस्पर्धेच्या पीककापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या स्तरावरुन असंबंधीत मंडळ कृषि अधिकारी / कृषि अधिकारी यांचेकडे द्यावी व तसे लेखी आदेश निर्गमित करावे.

२) जिल्हास्तरावरील पिकस्पर्धेच्या पीककापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या स्तरावरुन असंबंधीत तालुका कृषि अधिकारी/ तंत्र अधिकारी, यांचेकडे द्यावी व तसे लेखी आदेश निर्गमित करावे.

३) राज्यस्तरावरील पिकस्पर्धेच्या पीककापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी विभागीय कृषि सहसंचालक यांच्या स्तरावरुन असंबंधीत उपविभागीय कृषि अधिकारी / कृषि उपसंचालक यांचेकडे द्यावी व तसे लेखी आदेश निर्गमित करावे.

४) राज्यस्तरावरील पिकस्पर्धेच्या स्पर्धकांच्या पीककापणीची तारीख कापणीपूर्वी किमान १० दिवस अगोदर मा. संचालक ( विस्तार व प्रशिक्षण) यांना कळविण्यात यावी.

Pik Spardha yojana 2023 स्पर्धक शेतकऱ्यांची पात्रता

कोणत्याही पातळीवरील स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्याकडे त्याच्या स्वताचे नावावर जमीन असली पाहिजे व ती जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे.

तालुका पातळीवरील पीकस्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतक-यांना भाग घेता येईल. जिल्हा पातळीवरील स्पर्धेत पूर्वी कधीही तालुका स्तरावरील स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र राहतील.

राज्य पातळीवरील स्पर्धेत यापूर्वी कधीही जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र राहतील.

स्पर्धेत भाग घेणा-या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

Pik Spardha yojana 2023 स्पधेसाठी प्रवेश शुल्क

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम रु.३०० राहील. प्रवेश शुल्क खालील लेखाशिर्षाखाली शासकीय कोषागारात मुदतीत जमा करावे.

स्पर्धा जाहीर झाल्यानंतर सहभागी शेतकऱ्यास प्रवेश शुल्क परत दिले जाणार नाही.

पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाने स्पर्धेतून माघार घ्यावयाची झाल्यास कापणीपूर्वी किमान १५ दिवस अगोदर माघार घेतल्याचे सर्व संबंधित अधिकाऱ्यास लेखी कळवावे. तसेच माघार कोणत्या कारणासाठी घेतली हे अर्जात सुस्पष्ट नमुद करावे.

• पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी ०५ व आदिवासी गटासाठी ०४

Pik Spardha yojana 2023 अर्ज दाखल करण्याची तारीख

निरनिराळया हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल.

खरीप हंगाम- मूग व उडीद पिक:- ३१ जुलै,

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल:- ३१ ऑगस्ट

रब्बी हंगाम- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस:- ३१ डिसेंबर

पिकस्पर्धा विजेते – बक्षीसांचे स्वरूप

जिल्हा व तालुका पातळीवरील बक्षिसे संबंधित पातळीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन सन्मानपूर्वक देण्यात यावीत.

राज्यपातळीवरील पिकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे, कृषि पुरस्कार सत्कार समारंभात देण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: