पावसाच्या खंडासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित परभणी जिल्ह्याची नजरांदाज पैसेवारी ( Parbhani paisevari ) जाहीर, शेतकरी चिंतेत
Parbhani paisevari 2023 हंगामी पैसेवारी परभणी
परभणी जिल्ह्याची आणेवारी ( Parbhani paisevari ) 52.92 टक्के ओल्या दुष्काळाचा परिणाम, उत्पादकता घटली.
जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ५२ मंडलांमध्ये यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांना पाण्याचा ताण बसला. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.
जिल्हा प्रशासनाकडून ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित हंगामी पैसेवारी व १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांतील दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले.
तालुकानिहाय तालुक्यात समाविष्ठ गावांची संख्या आणि खरीप हंगाम नजर अंदाज पैसेवारी
परभणी जिल्हा हंगामी पैसेवारी स्थिती Parbhani paisevari 2023
परभणी गावांची संख्या १२८… पेरणी क्षेत्र ९६०८२, पैसेवारी ५३.०० पैसे
जिंतूर गावांची संख्या १६९… पेरणी क्षेत्र ८३८९३, पैसेवारी ५२.२० पैसे
सेलू गावांची संख्या ९५… पेरणी क्षेत्र ६२२२६, पैसेवारी ५१.४८ पैसे
मानवत गावांची संख्या ५३. पेरणी क्षेत्र ४२२४०, पैसेवारी ५३.२३ पैसे
पाथरी गावांची संख्या ५६… पेरणी क्षेत्र ३७३९२, पैसेवारी ५५.३० पैसे
सोनपेठ गावांची संख्या ५३… पेरणी क्षेत्र ३३४२९, पैसेवारी ५१.५० पैसे
गंगाखेड गावांची संख्या १०५… पेरणी क्षेत्र ५९२०८, पैसेवारी ५२.०० पैसे
पालम गावांची संख्या ८२… पेरणी क्षेत्र ४६१२९, पैसेवारी ५५.०० पैसे
पूर्णा गावांची संख्या ९४… पेरणी क्षेत्र ५८७१५, पैसेवारी ५२.६१ पैसे
राज्यात खरिप पीक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, पिकांचे नुकसान, घटलेली उत्पादकता याची माहिती दर्शविण्यासाठी आणेवारीचा आधार घेतला जातो.
जर जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्याच्या आतमध्ये असेल तर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त समजला जातो. जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्के आत असेल तर विविध हा निर्णय उपयोगी पडतो.
कृषिपंपाच्या वीज बिलामध्ये सवलत दिली जाते.
शेतकयांच मुलांच्या शिक्षणाच्या फीमध्ये देखील सवलत असते. शेतसारा भरताना सूट मिळते.