बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, व्याज परतावा शासन करणार | msobcfdc loan scheme

MSOBCFDC Loan scheme अंतर्गत घ्या शैक्षणिक कर्ज, व्याजाचा परतावा शासन करेल, पहा काय आहेत अटी, शर्ती, पात्रता. सविस्तर माहिती खालील लेखात.

msobcfdc loan scheme

MSOBCFDC Loan scheme 2023

तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांत व देशांत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता, या शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची व्यवस्था शासन करणार आहे.

घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील ‘व्याज कसे द्यायचे’ या चिंतेतून आता विद्यार्थी वर्गाची सुटका होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट दयावी. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो.

जाणून घेऊया सविस्तर काय आहे योजना.

राज्यातील इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील OBC विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लक्ष रूपयापर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा, तर राज्यांतर्गत व देशांतर्गत अभासक्रमांसाठी जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत करण्यात येतो.

या योजनेमुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होवून त्यांचे करीअर घडविण्यास मोठी मदत होत आहे.

MSOBCFDC Loan scheme अटी शर्ती

योजनेच्या लाभासाठी अर्जदार विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे असावे.

अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असावा तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा हे बंधनकारक आहे.

अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लक्ष रूपयांपर्यंत असावी.

अर्जदार हा इयत्ता बारावी कमीत कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.

MSOBCFDC Loan scheme कागदपत्रे-

अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.

तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.

तहसीलदार यांचा महाराष्ट्र राज्य रहिवासी दाखला.

अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड ,

तसेच ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज घेणे आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता परिक्षा उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका.

अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराचा जन्माचा पुरावा.

अर्जदार विद्यार्थ्याचा वयाचा पुरावा, शैक्षणिक शुल्क संबधित पत्र. शिष्यवृत्ती (Scholarship) , शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते पुरावा अशी कागदपत्र लागतील.

तसेच इतर आवश्यक कागदपत्रे व पुरावे.

obc karj yojana 2023 शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम

राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम

आरोग्य विज्ञान – MBBS,BDS,BAMS,BHMS,B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

अभियांत्रिकी – B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.

व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.

कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

देशांतर्गत अभ्यासक्रम

केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद,शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC ) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे.

यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

परदेशी अभ्यासक्रम

आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

ओबीसी कर्ज योजना व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी

शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येतो.

msobcfdc loan scheme अर्ज कसा करावा

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळा मार्फत राबविली जाणारी ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.

या अर्जावरील पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे.

अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: