खरीप हंगाम 2023 करिता महाबीज बियाणे दर जाहीर, पहा काय असतील बियाण्यांचे भाव – Mahabeej seed rate for kharif 2023
खरीप हंगाम २०२३ साठी महाबीजनं विविध बियाण्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करण्याचा प्रयत्न ‘राज्य बियाणे महामंडळ’ अर्थातच ‘महाबीज’कडून केला जातो.
पाहुयात काय आहेत नवीन दर.
महाबीज बियाणे दर – Mahabeej seed rate for kharif 2023
सोयाबीन बियाणे दर Soyabean seed Rate
फुले संगम, फुले किमया, MAUS-६१२, १६२ या वाणांची २० किलो ची बॅग चा दर ₹२०४० असेल.
तर एमएसीएस-११८८, AMCS 1281, maus158 या वाणांची ३० किलोची बॅग ₹३०६० ला मिळेल.
तूर बियाणे दर Tur seed price
तूर बियाण्यामध्ये बीडीएसन-७१६, फुले राजेश्वर पीकेव्ही तारा या वाणाचे २ किलो बॅग ३९० रुपये तर बीडीएन-७११, बीएसएमआर-७३६, मारुती, आयसीपीएस-८७११९ (आशा) या वाणांची २ किलो बॅग ३६० रुपयात मिळेल.
भात बियाणे दर
भाताच्या वाणामध्ये इंद्रायणी- १० किलो बॅग साठी ६६० रुपये दर, २५ किलो बॅग साठी १६०० इतका भाव असेल. याचप्रमाणे कोईमतूर-५१ च्या २५ किलो बॅग साठी १०७५ रुपये इतका भाव असेल.
मूग बियाणे भाव mahabeej seed price 2023
मूग बियाणे उत्कर्षा, पीकेव्हीएम-४, बीएम-२००३-२ व इतर वाण- २ किलो बॅग ३६० रुपये तर ५ किलो बॅग ८७५ रुपये असा दर असेल.
उडीद बियाणे भाव
उडीद बियाणे एकेयू १०-१ (बॅल्क गोल्ड), टीएक्यू-१ हे२ किलो बॅग ३५० रुपये दर, ५ किलो, ८५० रुपये असे असेल.
शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, औषधांसाठी अनुदान | Rashtriya Ann suraksha abhiyan 2022
संकरित ज्वारी मध्ये सीएसएच-९, महाबीज-७, सीएसएच-१४, भाग्यलक्ष्मी-२९६ साठी ३ किलो चा दर ४२० रुपये असेल.
संकरित बाजरी मध्ये महाबीज १००५- १.५ किलो- २४० रुपये तर सुधारित बाजरी- धनशक्ती- १.५ किलो, १६५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
नागली बियाणे – फुले नाचणी- १ किलो, ११० रुपये
संकरित- सूर्यफूल- ५०० ग्रॅम, १५० रुपये
याप्रमाणे असतील.शेतकरी बांधवांनी महाबीज बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे. कोठेही जास्त दराने विक्री होत असेल तर तालुका टास्क फोर्स किंव्हा तालुका कृषी कार्यालय मध्ये तक्रार करावी.