आता या कर्जांना मिळणार ५०% सवलत | Karjmafi Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्जदारांसाठी कर्ज व्याजात सवलत देण्याचा निर्णय जाहीर. Karjmafi Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज परतफेडीची मुदत संपलेल्या लाभार्थींकरिता संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्यांकरिता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS karjmafi Yojana Maharashtra ) योजना  सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज परतफेडीची मुदत संपलेले अनेक लाभार्थी आहेत.

Karjmafi Yojana Maharashtra
Karjmafi Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा कडून या कर्ज वसुलीसाठीचे प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत.

त्यासाठी ही योजना 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

राज्यात मागील दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीमुळे बऱ्याच लाभार्थींचे व्यवसाय बंद झालेले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अशा परिस्थितीत कर्ज परतफेड सुसह्य व्हावे व उदरनिर्वाहासाठी त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत याकरीता महामंडळाने संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थींकरीता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS karjmafi Yojana Maharashtra ) योजनेस मान्यता दिली आहे.

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला एकूण थकित कर्जातील व्याजाच्या रक्कमेत 50 % इतकी भरीव सूट देण्यात येणार आहे.

OTS karjmafi Yojana Maharashtra ही योजना राबविण्यासाठी महामंडळाच्या दिनांक 15 मार्च 2022 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

Mahamandal Name change

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यासाठी राज्य  शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील दुर्बल घटकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

आजपर्यंत या महामंडळाकडून विविध योजनांच्या माध्यमातून इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना अल्प व्याज दराने कर्ज  देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासात महामंडळाचे बहुमूल्य योगदान आहे त्यामुळे या महामंडळाला  संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

अंधश्रध्देच्या विळख्यातून मुक्त करून, समाजाला स्वच्छतेचा व शिक्षणाचा कानमंत्र देण्याचे महनीय कार्य संत गाडगेबाबा यांनी केले आहे. त्यांचे स्मरण राहावे यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी महामंडळाचा नामविस्तार संत गाडगेबाबा यांचे नावे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

या प्रस्तावास महामंडळाच्या  १५ मार्च २०२२ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: