Kanda chal Anudan कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक गोदाम म्हणून कांदा चाळ उभारणी साठी आता मिळणार 1 लाख 60 हजार अनुदान
MGNREGA Kanda chal Anudan yojana 2023
परिणामी शेतकरी गरज असूनही कांदा चाळी बांधत नाहीत.
राज्यात खरीप हंगामात काढलेला कांदा लगेच मागणी असल्यास विकला जातो मात्र कमी भाव कमी मागणी असेल तर पर्यायाने त्याची साठवणूक करणे गरजेचे असते. रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो.
स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.
कांदा हे एक जिवंत पीक आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ‘कांदाचाळ’ या महत्त्वाच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक केली जाऊ शकते.
यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले आहे.
या योजने अंतर्गत अकुशल ६० टक्के प्रमाणे ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल ४० टक्केच्या मर्यादेत ६४ हजार १४७ रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण १ लाख ६० हजार ३६७ रूपये (एक लक्ष साठ हजार तीनशे सदुसष्ठ) इतके अनुदान मिळणार आहे.
उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी शेतकऱ्यांना स्वहिस्सा, लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध करावा लागेल.
कांदाचाळीसाठी एकूण प्रकल्प खर्च – ४ लाख ५८ हजार ७३० रुपये येणार आहे.
कांदा साठवण करण्याच्या गोदामाची अर्थात कांदा चाळी ची रुंदी ३.९० मी. लांबी १२.०० मी. एकूण उंची – – २.९५ मी. (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील.
साधारण एक हे. धारण क्षेत्रावर २५ मे. टन कांदा उत्पादन होते.
कांदा चाळ अनुदान योजना चा लाभ सामुदायिकरित्या शेतकरी घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना देखील या योजनेचा सामुदायिक लाभ घेता येणार आहे. या बाबीचा लाभ गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार आहे.
Kanda Chal New GR PDF महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ
Dbt antargat kandachal keli tar hi scheme tyana lagu raahil kaa ki yaa sathichi process kaahi vegali ahe