जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( hingoli antim paisewari ) 50 पैशाखाली घसरली, अंतिम आणेवारी जाहीर.
Hingoli antim paisewari 2022 jahir हिंगोली जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर.
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३० ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारी कडे लागले होते.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून जुलै पावसाचा खंड व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
पावसाळ्यात अनेकवेळा झालेली अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ४७.३२ पैसे आली असल्याचे जाहीर केले
यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील ( antim paisewari Kharip Season) पिकांची अंतिम आणेवारी / पैसेवारी हिंगोली जिल्हा प्रशासनातर्फे त्यानुसार हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली आहे.
तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी
हिंगोली तालुका 152 गावे 49.03 पैसे
कळमनुरी 148 गावे 47.59 पैसे,
वसमत 152 गावे 42 पैसे,
औंढा नागनाथ 122 गावे 49.30 पैसे,
सेनगाव 133 गावे 49.66 पैसे,
असे सरासरी 47.32 पैसे निश्चित करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या सवलती लागू होऊ शकतील, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते,