नागरी सहकारी बँकांच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा ! ekrakkami karj paratphed yojana नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू
नागरी सहकारी बँकाांचे वाढते एन.पी.ए. कमी करण्याच्या दृष्ट्टीने एकरकमी कर्ज परतफेड योजना महत्वाची आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजना नागरी सहकारी बँकांचे वाढते एन.पी.ए. कमी होण्यास मदत होत आहे. आणि हीच बाब लक्षात घेऊन नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास 04 जुलै 2024 रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.
नागरी सहकारी बँकांसाठी एकरक्कमी कर्ज परतफेड योजना 2024 ekrakkami karj paratphed yojana
GR Download HERE 4 july 2024
GR 01 July Download
योजनेसाठी पात्र कर्जदार Eligible Beneficiary
दिनांक 31/03/2023 अखेर जी कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित (Doubtful) किव्हा त्या वरील वर्गवारीत समाविष्ट केलेली आहेत अशा सर्व कर्ज खात्यांना हि ekrakkami karj paratphed yojana योजना लागू राहील.
दिनांक 31/03/2023 अखेर अनुत्पादक कर्जाच्या सबस्टॅंडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्ज खात्यांना हि योजना लागू होईल.
योजनेसाठी अपात्र कर्जदार
रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर योजना ही पुढील कर्जांना लागू होणार नाही.
फसवणूक गैरव्यवहार करून घेतलेली कर्ज व जाणीवपूर्वक थकविलेले कर्ज.
रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करून वितरीत केलेली कर्ज.
आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था कंपन्या अथवा संस्था यांना दिलेल्या कर्जांना अथवा त्यांची जादार असणाऱ्या कर्जांना रिझर्व बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय सदर योजना देता येणार नाही.
संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना ज्याच्यामध्ये संचालकाची पत्नी पती वडील आई भाऊ बहीण मुलगा मुलगी जावई किंवा सून अशा व्यक्तींना सदरची योजना लागू होणार नाही.
चार पगार दारांच्या मालकांशी जर पगार कपातीचा करार झालेला असेल तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जासाठी सदर योजना लागू होणार नाही
ekrakkami karj paratphed yojana योजनेची मुदत
योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत राहील. दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत निर्णय घ्यावा लागेल.
योजनेची व्याप्ती
ekrakkami karj paratphed yojana ही योजना सर्व प्रकारच्या कर्जांना तसेच कर्ज व्यतिरिक्त दिलेल्या तात्पुरत्या उचल मर्यादा, बिल डिस्काउंट व इतर आर्थिक सवलतींना लागू होईल.
कोणतेही कायद्याअंतर्गत कारवाई चालू असणाऱ्या व कलम 101 अन्वय वसुली दाखला प्राप्त व कलम 91 अन्वये निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांना ही योजना लागू होईल.
जेथे कर्जदारांची एकापेक्षा जास्त कर्जखाते असतील व त्यापैकी एखादे कर्ज खाते अनुत्पादित झाला असेल तर इतर सर्व कर्जखाते समूह करते म्हणून अनुत्पादक होतात तर सर्व कर्ज खात्यांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेची सवलत देण्यात येईल
तडजोडीचे सूत्र
ekrakkami karj paratphed yojana या योजनेसाठी तडजोडीचे सूत्र रिझर्व बँकेने उत्पन्न संकल्पना जिंदगी चे वर्गीकरण व अनुत्पादक जिंदगी साठी करावयाच्या तरतुदीसाठी प्रसिद्ध केलेल्या मास्टर सर्क्युलर प्रमाणे असेल ज्या चार्ट आपण खाली पाहू शकता.
ekrakkami karj paratphed yojana योजनेसंदर्भात बँकांनी करावयाची कारवाई आणि बँकांना असलेले नियम
सदरची योजना स्वीकारणं हे बँकांवर बंधनकारक नाही मात्र सदर योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदार मध्ये कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्याचे बंधन बँकांवर असणार आहे.
सदर योजना स्वीकारायची असेल किंवा नसेल हा निर्णय बँकेने घ्यायचा आहे मात्र योजना स्वीकारल्यानंतर त्या संदर्भातील संचालक मंडळाचा ठराव योजना जाहीर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकाकडे 30 दिवसाच्या आंत मध्ये सादर करणे आवश्यक राहील.
सदरची योजना स्वीकारल्यानंतर त्याची माहिती सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर तेल लावणं हे बँकेला बंधनकारक राहील. योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेचे अध्यक्ष दोन ते तीन संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे उपसमितीचे सदस्य असतील. या योजनेअंतर्गत नामंजूर करण्यात येणाऱ्या सर्व कर्जदाराला कारणासह ना मंजुरीचे पत्र देणे हे त्या बँकेला बंधनकारक राहील. तडजोड रकमेचा भरणा अर्जदाराने त्याच बँकेतून नवीन कर्ज घेऊन करावयाचा नाही बँकेतील अशा इतर कोणतेही कर्जातून तडजोड रकमेचा भरणा झाल्यास त्याकरता संचालक मंडळास जबाबदार धरुन कारवाही करण्यात येईल.
कर्ज परतफेड कालावधी
परतफेड करण्यासाठी चा कालावधी कर्जदाराने नागरी सहकारी बँका साठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार करावयाच्या अर्जासोबत सदर कर्ज प्रकरण ज्यादिवशी अनुत्पादन कर्जाच्या संशयित वर्गवारी मध्ये वर्गीकृत केली असेल त्या दिवशीच्या लेजर बॅलन्स च्या मुद्दल आणि व्याज किमान 5% भरणा करणे आवश्यक आहे.
नागरी सहकारी बँका साठी एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत ( ekrakkami karj paratphed yojana ) अर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एक महिन्यांमध्ये तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे. अथवा नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत कर्जदाराने तडजोड रकमेच्या किमान 25% भरावी लागेल.
पूर्ण रक्कम न भरल्यास उर्वरित रक्कम भरण्यास पुढील जास्तीत जास्त 11 महिन्याचा कालावधी देता येईल.
उर्वरित 75 टक्के रकमा भरणा पुढील 11 मासे खात्यामध्ये करावयाचा असून त्यासाठी सहा टक्के सरळव्याज पद्धतीने व्याज आकारणी केली जावी आणि या कालावधीमध्ये हप्ता भरण्यास उशीर झाल्यास त्या उशीर झालेल्या मुदतीसाठी उशीर झालेल्या रकमेवर ती दसादशे दोन टक्के दंडव्याज आकारण्यात यावा.
योजने संबंधी महत्वाच्या तरतुदी
या योजनेमध्ये बदल करण्याचा बँकांना अधिकार असणार नाही. सदरची योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांना कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्याचे बंधन बँकांवर राहील.
एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत मिळणार या कर्ज खात्यांना महाराष्ट्र सहकार नियम 1961 चे कलम 49 अंतर्गत नमूद केलेली नीर लेखनाची प्रक्रिया लागू राहणार नाही.
या योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या खात्यांची सर्व माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेने नोंद घेण्यासाठी पुढील वार्षिक सभेस स्वतंत्र विषय द्वारे देण्याचे बंधन बँक वरती राहील. या योजने अंतर्गत होणाऱ्या वसुलीवर सरचार्ज लागणार नाही. जामीनदार हे सहन कर्जदार असल्याने या योजनेअंतर्गत कर्जदाराने अर्ज केला नाही तर तो जमीनदारांना ही अर्ज करता येईल सदर योजना ही राज्यातील मल्टीस्टेट सहकारी बँका सोडून सर्व नागरी सहकारी बँकांना लागू राहील.
अर्ज प्रक्रिया / अर्जाचा नमुना
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला एक विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे. ज्या अर्जाचा नमुना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
अर्जदाराने करावयाच्या अर्जाचा नमुना