देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर बंदी || Devsthan Jamin

Devsthan Jamin – राज्य शासनानं राज्यातील देवस्थान वतन जमिनीच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे देण्यात आलेले आहेत.

Devsthan Jamin

Devsthan Jamin Gr 2025

राज्य शासनानं राज्यातील देवस्थान वतन जमिनीच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.राज्यातील देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे देण्यात आलेले आहेत.

यासंबंधात उपमहानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कार्यालयातून १३ मे २०२५ रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरविण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही.

१३ मे २०२५ रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत देवस्थान वतन जमिनींसंबंधी अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली व अखेर हा निर्णय घेण्यात आला.

13 मे 2025 देण्यात आलेल्या निर्देशानुसार देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवण्यात येत आहे. त्यामुळे या जमिनीविषयी सक्षम अधिकाऱ्याचे विक्री आदेश अथवा न्यायालयाकडून विक्री आदेश असतील तरच फक्त व्यवहार करता येतील. या व्यतिरिक्त राज्यातील कोणत्याही देवस्थान मिळकतीचे खरेदी-विक्री व्यवहारांचे दस्त नोंदणीस स्वीकारू नये, असे दस्त स्वीकारल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित दुय्यम निबंधक यांची असेल असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

परिपत्रक येथे पहा.
👇🏻👇🏻

GR PDF LINK

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *