नैसर्गीक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीतून कर्ज वसुली करणाऱ्या (Crop loan settlement) बँकांना शासनाचा दणका, शासनाचे परिपत्रक निर्गमित.
Crop loan settlement
नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते.
मात्र शेतकऱ्यांना दिली जाणारी ही भरपाई बँकांच्या माध्यमातून विविध प्रकरणात वसुली बाकी असेल तर परस्पर वळती करून वाटली जात नाही.
आणि याच निर्देशाच्या अनुषंगाने सहकार विभागामार्फत बँकांना आदेश देण्या साठी एक परिपत्रक काढण्यात आले आहे.
Crop loan settlement शासन परिपत्रक PDF link
या परिपत्रकानुसार माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने निधीचे वाटप करताना विविध दक्षता घेण्याचे महसूल व वन विभागाच्या आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार या परिपत्रकान्वये सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करू नये.
याबाबतची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल, याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दक्षता घ्यावी, असे ही नमूद करण्यात आले आहे.