शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी ( CM kisan 2023 ) अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये मानधन.
GR link
नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत.
Namo Shetkari 2nd Installment GR
नमो शेतकरी योजनेंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी वितरीत
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना सन २०२३-२४ पासुन खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Namo shetkari mahasanman nidhi योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहतील
सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने pm kisan अंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.
पी. एम. किसान पोर्टल ( pm kisan portal ) वर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
योजनेची कार्यपद्धती:-
पी. एम. किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या पोर्टलवरुन / प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली:-
पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल / प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.
केंद्र शासनाच्या संमतीने पी. एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा जाहीर केली आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी लाभार्थी CM Kisan Beneficiary
सामान्यत: या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी Namo Shetkari योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे.
नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
शासनाच्या या नवीन नमो शेतकरी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जायचे; परंतु आता या नवीन योजना मुळे बारा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
https://www.prabhudevalg.com/2022/03/budget-maharashtra-2022.html
https://youtube.com/live/i5O8fqOGJv4?feature=share
नमो शेतकरी योजनेंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी वितरीत नमो शेतकरी योजनेंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी वितरीतनिधी योजनेंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी वितरीतयोजनेंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी वितरीत
PM KISAN YOJANA
I want to apply for Kisan credit card