बुलढाणा जिल्ह्याची खरीप पैसेवारी जाहीर | Buldhana kharip paisewari 2024

पावसाचा खंड, अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या बुलढाणा जिल्ह्याची खरिप हंगाम 2024 Buldhana kharip paisewari ची पैसेवारी जाहीर

Buldhana kharip paisewari

Buldhana kharip paisewari 2023 hangami paisevari declared.

बुलढाणा जिल्ह्यात या मोसमात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.

या खरिपात जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. जाहीर झालेल्या पीक पैसेवारीनुसार जिल्ह्यातील १३४७ गावांची नजरअंदाज पीक पैसेवारी ५० पैशांवर तर ७३ गावांची नजरअंदाज पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील 1420 पैकी एकमेव शेगाव तालुक्यातील ७३ गावांची पैसेवारी ५० च्या आत आली आहे.

बुलडाणा तालुक्यातील ९८ गावांची अंतिम पीक पैसेवारी ७२, चिखली तालुक्यात १४४ गावांची पैसेवारी ७०, देऊळगाव राजा ६४ गावांची पैसेवारी ७२, मेहकर १६१ गावांची पैसेवारी ७२, लोणार ९१ गावांची पैसेवारी ६२, सिंदखेड राजा ११४ गावांची पैसेवारी ६८, मलकापूर ७३ गावांची पैसेवारी ६७, मोताळा १२० गावांची पैसेवारी ६१, नांदुरा ११२ गावांची पैसेवारी ६५, खामगांव १४६ गावांची पैसेवारी ५३, जळगांव जामोद ११९ गावांची पैसेवारी ५५ पैसे आणि संग्रामपूर १०५ गावांची अंतिम पीक पैसेवारी ७३ आहे. तर ५० पैशांपेक्षा कमी शेगांवमधील ७३ गावांची ४७ पैसेवारी जाहीर झाली आहे

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित पीक पैसेवारीत जिल्ह्यातील एकूण १४20 महसुली गावे आहेत

मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची सुधारित Buldhana kharip paisewari पैसेवारी कशी येते याकडे नजर लागली होती.

https://grnshetiyojna.in/hingoli-kharip-paisewari-2022-declared/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *