Harbhara hamibhav nondani 2024 – किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम हमीभावाने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु.

hamibhav nondani 2024
राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर मागील सन २०२३-२४ या वर्षाच्या हमीभावापेक्षा रू. २९२/- प्रति क्विंटल इतका जास्त आहे.
केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही नोडल एजेन्सी सोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरीता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करुन नाफेड व एन.सी.सी.एफ . कार्यालयाने २६ जिल्ह्यांतील एकुण २५६ खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असुन त्यापैकी २४२ खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. कार्यन्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे 2024-25 हंगामातही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, मूग, उडीद, व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाफेड कार्यालयाने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी (eSamriddhi) पोर्टल सुरू केले आहे. ‘नाफेड’मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करावी.
राज्यातील शेतकऱ्यांनी https://esamridhi.in/#login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर पूर्वनोंदणी करावी आणि केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.
ई-समृद्धी पोर्टल वरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी विलास मारुतीराव सोमारे (भ्रमणध्वनी क्र. 8108182950), एमईएमएल कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीधर कानडे (भ्रमणध्वनी क्र. 9561717175) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाफेड कार्यालयाने 19 जिल्हयातील 146 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. तसेच एनसीसीएफ कार्यालयाने 7 जिल्हयांतील 63 खरेदी केंद्राना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे राज्यात एकुण 209 खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात आली असुन त्यांच्या मार्फत शासनाने निच्छित केलेल्या कालावधीत मुग, ऊडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.
नाफेड कार्यालयाने 19 जिल्ह्यातील 146 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये अकोला-9, अमरावती 8, बीड-16, बुलढाणा-12, धाराशीव-15, धुळे-5, जळगाव-14, जालना-11, कोल्हापूर-01, लातूर-14, नागपूर-8, नंदूरबार-2, पुणे-01, सांगली-2, सातारा-01, वर्धा-8, वाशिम-5, यवतमाळ-7 आणि परभणी जिल्ह्यातील 8 खरेदी केंद्राचा समावेश आहे.
एनसीसीएफ कार्यालयाने 7 जिल्ह्यातील 63 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 6, अहमदनगर-7, सोलापूर-11, छत्रपती संभाजीनगर-11, हिंगोली-9, चंद्रपूर-5 आणि नांदेड-14 खरेदीकेंद्राचा समावेश आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना हि शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. यामुळे सर्व शेतक-यांनी मुग, उडीद व सोयाबीन विक्री करीता आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुण घ्यावी व आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानतंर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत-जास्त शेतक-यांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा,
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुंग, उडिद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात आली असुन प्रत्यक्षात मुंग, उडिद खरेदी ही दिनांक 10 ऑक्टोबर 2024 आणि सोयाबीन खरेदी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून करण्यात येणार आहे.
परभणी जिल्हयाला मंजुर खरेदी केंद्र संख्या – परभणी (8) मंजूर खरेदी केंद्र – 1) परभणी तालुका सह खरेदी विक्री संघ (खरेदी केंद्र,परभणी) 2) जिंतुर जिनिंग अॅन्ड प्रेसिंग सह सो.लि. जिंतुर (खरेदी केंद्र,जिंतुर) 3) पूर्णा तालुका सह खरेदी विक्री संघ पूर्णा (खरेदी केंद्र, पूर्णा) 4) मानवत तालुका सह खरेदी विक्री संघ मानवत (खरेदी केंद्र मानवत) 5) स्वस्तिक सुशिक्षित बेरोज. सेवा सह संस्था (खरेदी केंद्र, पाथरी) 6) स्वप्नभुमी सुशिक्षित बेरोज, सेवा सह संस्था (खरेदी केंद्र, सोनपेठ) 7) तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म.बोरी (खरेदी केंद्र, बोरी) 8) तुळजाभवानी कृषी विकास सेवा सह संस्था म.बोरी (खरेदी केंद्र, सेलु)
हिंगोली
मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्थेचे खरेदी केंद्र वारंगा फाटा व कळमनुरी येथे आहेत. वारंगा फाटा येथील केंद्रावर केंद्र चालक म्हणून मारोती शिवदास कदम (संपर्क 9736449393) तर कळमनुरी येथील केंद्रावर प्रशांत तुकाराम मस्के (9921609393) हे आहेत.
हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून शेख गफार शेख अली हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881501040 असा आहे. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था,हिंगोली या संसथेचे खरेदी केंद्र बळसोंड जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून नारायण शामराव भिसे हे कामकाज पाहणार असून 9850792784 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कृष्णा नामदेव हरणे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9175586758 असा आहे. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल जयाजीराव काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा संपर्क क्र. 8007386143 आहे.
विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. या केंदावर केंद्र चालक म्हणून उमाशंकर वैजनाथ माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. या केंद्राचे केंद्र चालक म्हणून निलेश रावजीराव पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून सागर प्रभाकर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8390995294 असा आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मुंग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी #महागाव, #पांढरकवडा, #झरी, #पुसद, #आर्णी, #दिग्रस व #बाभुळगाव तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
Satbara vr chana chi nond nh yet ah ..peek pera bharun suddha…..any solution