बीड जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( beed paisewari ) 50 पैशाखाली घसरली, अंतिम आणेवारी जाहीर.
Beed paisewari 2023 jahir बीड जिल्हा खरीप पिकांची 2023 ची अंतिम आणेवारी / अंतिम पैसेवारी जाहीर.
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड व शेवटी सप्टेबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्ण उघडीप घेतली.
यानंतरच्या काळातही पिकांमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश पिके हातातून गेली.
यातच आता बीड जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 46.68 पैसे निघाली आहे
- बीड ४५
आष्टी ४६
पाटोदा ४७.६८
वडवणी ४७.१०
शिरूर ४५.२६
गेवराई ४७.६४
अंबाजोगाई ४६
केज ४७.६७
माजलगाव ४६.७१
धारूर ४५.०३
परळी ४७.५०
एकूण सरासरी ४६.६८
हंगामी पैसेवारी Beed Hungami paisewari 2023 update
जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी हंगामी पैसेवारी Beed paisewari जाहीर केली. जिल्ह्याची ही पैसेवारी 48 टक्क्यांच्या घरात आहे.
शेवटी पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर पिकांच्या पेरणी क्षेत्राचे प्रमाण व कापणी प्रयोगाअंती आलेली पैसेवारी यांची भारांकित सरासरी काढली जाते.
त्यानुसार महसूल गावाची पैसेवारी काढली जाते. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पूर्वी पैसेवारीचा आधार घेतला जात असे. परंतु आता वेगवेगळे निकष ग्राह्य धरून दुष्काळ जाहीर केला जातो. त्यात माती आर्द्रता, पीक कापणी प्रयोग, पाणी पातळी यासह इतर बाबींचा समावेश आहे. असे असले तरी पैसेवारी महत्त्वाची मानली जाते. महसूल विभागाने ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे.
त्यानुसार बीड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून सरासरी पैसेवारी Beed paisewari ही ४८.०७ एवढी जाहीर करण्यात आली आहे.
तालुकानिहाय आकडेवारीचे अवलोकन केले तर गेवराई तालुक्याची पैसेवारी ५४.१९ असल्याचे दिसून येते.
बीड तालुका – ४६.०० पैसे , आष्टी तालुका – ४६.०० पैसे, पाटोदा तालुका -४६.५९ पैसे, वडवणी तालुका – ४८.४० पैसे,
शिरुर कासार तालुका – ५०.७९ पैसे, गेवराई तालुका – ५४. १९ पैसे, अंबाजोगाई तालुका – ४८.०० पैसे, केज पैसे – ४७.३७ पैसे, माजलगाव तालुका -४८.५७ पैसे, धारुर तालुका -४५.०३ पैसे, परळी तालुका – ४७.८३ पैसे तर सरासरी बीड जिल्हा एकूण – ४८.०७ पैसे.
यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगताही आले नाही. नंतर पावसाच्या खंडाने शेताचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.