Bandhkam Kamgar Pension ₹12,000 पेन्शन, पात्रता अर्ज नमुना माहिती

राज्य शासनाचे दोन मोठे निर्णय बांधकाम कामगारांना खुशखबर, बांधकाम कामगारांना ₹12,000 पेन्शन, पात्रता अर्ज नमुना माहिती Bandhkam Kamgar Pension

Bandhkam Kamgar Pension

Bandhkam Kamgar Pension Gr 2025

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (२२) (ब) मध्ये वयाची ६० वर्षे पुर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे.

याबाबत केंद्र शासनाने विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक २८.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उक्त शासन निर्णयातील परिच्छेद ४ (घ) मध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद करण्यात आले होते.

राज्यात मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती SOP (Standard Operating Procedure) विहीत करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यास अनुसरुन मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती (SOP) पुढीलप्रमाणे

बांधकाम कामगार निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष :- Bandhkam Kamgar Pension Eligibility

(अ) वयाची ६० वर्षे पुर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान १० वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील.

(ब) पती/पत्नी च्या मृत्यूनंतर संबधित बांधकाम कामगाराचे पती/पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील. तथापि, पती/पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.

(क) केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ (Employees State Insurance Act, १९४८) व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतूदी कायदा, १९५२ (The Employees Provident Fund and Miscellaneous Provision Act, १९५२) अंतर्गत लाभप्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत.

बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण/दर :-

(अ) मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल.

(ब) मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण/दर खालीलप्रमाणे राहील :-

(क) मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेवून, सदर योजनेअंतर्गत देय निवृत्तीवेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतला जाईल.

बांधकाम कामगार निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती :-

(अ) सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने https://mahabocw.in/ या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त (Download) करून घ्यावा. (अर्जाचा नमूना “प्रपत्र-अ” प्रमाणे)

(ब) सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे (WFC) प्रभारी (कामगार उपायुक्त/सहायक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांच्याकडे जमा करावा.

बांधकाम कामगार निवृत्तीवेतन योजना अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत :-

१. पत्त्याचा पुरावा-आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत

२. जन्मतारखेचा पुरावा-जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित छायाप्रत ३. बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत

Gr Pdf link 👇 👇

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती (SOP-Standard Operating Procedure)

बांधकाम कामगार योजना अर्ज ऑनलाईन कसा दाखल करावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *