Ativrushti bharpai 2022 आता या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

Ativrushti bharpai 2022 वाटपासाठी निकषात मोठा बदल करण्यात आला आहे यामुळे अतिवृष्टी भरपाई वाटपाच्या अटी मुळे अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ativrushti bharpai 2022

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्त व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचे दर व निकष शासन निर्णय महसूल व वन विभाग, दि. १३.५.२०१५ अन्वये निश्चित करण्यात आले आहेत.

या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या विविध बाबींवर राज्य शासनाने वेळोवेळी वाढीव दराने निधी देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.

महसूल व वन विभागाच्या दि.१३.५.२०१५ च्या शासन निर्णयामध्ये केंद्र शासनाच्या निकषानुसार २ हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमीन नुकसानीसाठी मदत देण्याकरिता पुढीलप्रमाणे तरतुद आहे.

अ) शेत जमिनीवरील गाळ (वाळूचा/ गाळांचा/ मातीचा थर ३ इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे, राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक)

ब) डोंगराळ शेत जमिनीवरील मातीचा ढिगारा (मलबा) काढणे.

क) मत्स्यशेती दुरुस्ती करणे / मातीचा थर काढणे / पूर्ववत करणे

वरील प्रत्येक बाबींकरिता रु.१२,२०० /- प्रति हेक्टर (मात्र, लाभार्थ्यांनी अन्य कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत अथवा अर्थसहाय्य / अनुदान घेतलेले नसावे.

ड) दरड कोसळणे, जमीन खरडणे खचणे व नदी पात्र / प्रवाह बदलल्यामुळे शेत जमिन वाहून जाणे

महसूल अभिलेखानुसार शेत जमिनींचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना रु. ३७,५००/- प्रति हेक्टर या दराने मदत अनुज्ञेय राहील.

केंद्र शासनाच्या निकषानुसार वरीलप्रमाणे शेत जमिन व इतर नुकसानीसाठी दिली जाणारी मदत ही केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुज्ञेय असल्याने २ हेक्टर पेक्षा जास्त जमिन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना जरी त्यांच्या शेतजमिनीचे वर नमूद कारणास्तव नुकसान झाले तरी, कोणत्याही स्वरुपाची मदत देण्यात येत नाही.

तथापि, केंद्र शासनाचे हे निकष शिथिल करुन २ हेक्टरपेक्षा जास्त जमिन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा स्वरुपाची मागणी शासनास प्राप्त झालेली होती.

यास्तव खालील शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Ativrushti bharpai 2022 GR

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमीनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अटीमध्ये सुधारणा करण्याबाबत.

Download pdf

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत जमीनीच्या नुकसानीकरिता महसूल व वन विभागाच्या दि.१३.५.२०१५ च्या शासन निर्णयान्वये देय असलेली मदत विहित अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या २ हेक्टर पेक्षा जास्त जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील २ हेक्टरच्या मर्यादेत Ativrushti bharpai 2022 अनुज्ञेय करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

सन २०२२ च्या चालू हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतजमीनीच्या नुकसानीबाबत विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन आवश्यक त्या निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत शासनास सादर करावेत.

ही Ativrushti bharpai 2022 मागणी सादर करतांना विहित इतर अटी व शर्ती यांची पूर्तता झाल्याची खात्री करण्यात यावी. तसेच शेत जमीनीचे नुकसान झाल्याची खात्री करण्याकरिता ई-पीक पाहणीचा अथवा अन्य उपलब्ध नोंदीचा आधार घेण्यात यावा अशा सूचना ही या शासन निर्णयात घेण्यात आल्या आहेत.

या भरपाई वाटपासाठी ( Ativrushti bharpai 2022 ) होणारा खर्च प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत लेखाशिर्षाखाली राज्य शासनाच्या मंजूर व उपलब्ध निधीमधून भागविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *