राज्यात VB-G RAMG; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

केंद्र शासनाने मनरेगा च्या जागेवर आणलेल्या विकसित भारत जी राम जी कायदा, 2025 ( VB-G RAMG) ची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे होणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

VB-G RAMG

VB-G RAMG 2026

१६ जून २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत विकसित भारत- जी राम जी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यात केंद्र पुरस्कृत विकसित भारत – जी राम जी (VB-G RAMG) योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत – जी राम जी कायदा, २०२५ या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी करण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शाश्वत उपजीविका संधींचा विस्तार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असून विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

या सुधारामुळे केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (https://www.prabhudevalg.com/2026/02/mantrimandal-baithak-2026.htmlग्रामीण) अर्थात ‘विकसित भारत-जी राम जी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे. त्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) कायदा, २०२५ मधील कलम ३० नुसार महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये सुसंगत सुधारणा करण्यात येणार आहे. 

तसेच महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मधील कलम ३-अ (१) अंतर्गत राज्यात ही योजना राबविण्यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करण्यास आणि त्यानुसार खर्चासही मान्यता मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या कायद्यातील आवश्यक सुधारणांना व त्याबाबतच अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल महोदयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

लवकरच अध्यादेश निर्गमित करून राज्यात १ जुलैपासून ही योजना लागू केली जाईल.