Temporary udid card धारक दिव्यागांना शासनाचा मोठा दिलासा. तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्याचे बंद करण्यात आलेले अनुदान शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.

Temporary udid card new GR
तर ज्या प्रकरणांमध्ये दिव्यांगाच्या तीव्रतेमध्ये कालांतराने कोणताही बदल होण्याची शक्यता नसते अशा दिव्यांगांना अधिकाऱ्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी दिव्यांगाचे प्रमाणपत्र ( UDID CARD ) दिले जाते.
राज्यात दिव्यांग व्यक्तीचे हक्क नियम 2017 च्या कलम 19 नुसार ज्या व्यक्तीला नियम 18 अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आलेला आहे अशी व्यक्ती शासन किंवा शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी सविल्याती सुविधा लाभांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे आणि याच अनुषंगाने अशी तात्पुरती दिव्यांग कार्ड मिळालेल्या लाभार्थ्यांना आता शासनाचे लाभ दिले जाणार आहेत.
17 जून 2026 रोजी काढण्यात आलेल्या जीआर नुसार ज्या लाभार्थ्याकडे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने निर्गमित केलेले वेद तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैद्यतेच्या कालावधीपर्यंत राज्यातील विशेषतः योजनांचा लाभ सुरू ठेवण्यात येण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अशा लाभार्थ्यांनी आपल्या तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याकडून दिव्यांग प्रमाणपत्राचे रिनिवल करून घेणे आवश्यक राहील जेणेकरून पुढील लाभ खंडित होणार नाहीत.
या निर्णयामुळे राज्यातील दिव्यांग व्यक्ती साठी राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेता योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेशंट योजना इत्यादी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाचा जीआर आपण खालील लिंक वरती पाहू शकता. 👇🏻👇🏻


