आकांक्षीत जिल्हा अंतर्गत सन 2026 27 च्या जिल्हा वार्षिक विकास आराखडा योजनेतून आदिवासी शेतकऱ्यांसाठी राळा व वरई पिकाची पीक प्रात्यक्षिक Adivasi Farmer Scheme

Adivasi Farmer Scheme 2026
दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्याचे खाद्य वाढवणे त्याचे महत्त्व जनसामान्यात रुजवणे याचप्रमाणे ज्या ज्या तालुक्यांमध्ये वाव आहे त्या ठिकाणी राळा व वरई पिकाचे क्षेत्र वाढवून उत्पादन वाढवणे हे महत्त्वाचे असे उद्देश घेऊन हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत निवड केलेल्या आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत सुधारित बियाणे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे याचबरोबर तृणधान्य पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दिले जाणार आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व अटी
हे अभियान केवळ आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबवले जात आहे यासाठी शेतकरी अनुसूचित जमातीचे असावे.
या अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिक ही बाब राबवली जाणार आहे जी थेट शेतकऱ्यांच्या शेतावरती राबवली जाईल.
या अभियानांतर्गत योजनेचा लाभ देण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ती ऑफलाइन पद्धतीने प्रथम अर्ज केलेल्या लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे या अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिकासाठी प्रति शेतकरी कमीत कमी एक एकर ते जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्राची मर्यादा राहील.
या अभियानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा अशी आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


