पिकांचं नुकसान झालंय, मग भरपाई साठी करा तात्काळ हे काम | pik vima claim 2023

राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाचा खंड पडला आहे, अशावेळी होणाऱ्या पिकांच्या नुकसानी करिता भरपाई मिळविण्याकरिता असा करा( pik vima claim 2023 ) पीक वीमा दावा.

pik vima claim 2023

crop insurance claim pik vima claim 2023

राज्यात जास्त पाऊस, वादळी वारा, पूर , गारपीट, पावसाचा खंड आणि इतर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना या नुकसानी करिता भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते.

याच प्रधानमंत्री पिक विमा योजना Pradhan fasal Bima Yojana 2022 खरीप हंगाम 2022 साठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रीमियम भरून नुकसान भरपाई मिळते. प्रधानमंत्री पिक विमा योजना लागवडीच्या आधी आणि काढणी पश्चात ही शेती पिकाला संरक्षण देते.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पिकाच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या हंगामात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई मिळते.

मात्र यासाठी नैसर्गिक आपत्ती मुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान झालेल्या वेळे पासून 72 तासाच्या आत पीक वीमा नुकसान भरपाई साठी संबंधित पीक विमा कंपनीला माहिती ( pik vima claim 2022 ) द्यावी असा नियम आहे.

या नियमानुसार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरल्यानंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटानंतर 72 तासाच्या आत कंपनीला नुकसान झाल्याची माहिती ( pik vima claim 2023 )द्यावी लागते.

वादळी वारा भूखलन गारपीट नैसर्गिक आग ढगफुटी आणि उभ्या पिकाचे इतर नैसर्गिक कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई साठी दावा करता येतो. अति पाऊस चक्रीवादळ गारपीट त्याच्या काढणीनंतर नुकसान झालं तरी पण विम्याचा संरक्षण दिले जाते. अशा सर्व परिस्थितीत शेतकरयांना पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला माहिती देणे बंधनकारक आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पिक विमा दावा दोन पद्धतीने करता येतो. एक ऑनलाईन ( Online crop insurance claim ) पद्धत तर दुसरी ऑफलाईन ( Offline crop insurance claim ) पद्धत.

या दोन्ही पद्धती पैकी कोणत्याही एका प्रकारे शेतकरी भरपाईसाठी दावा pik vima dava करू शकतात.

याचबरोबर शेतकरी जिल्ह्यानुसार जी कंपनी असेल त्या कंपनीला त्यांच्या टोल फ्री ( Crop insurance company Toll free number ) क्रमांकावर फोन किंवा इमेल करून देखील तक्रार करू शकतात.यासाठी संपर्क क्रमांक व ईमेल विम्याच्या पावतीवर दिलेला असतो.

ऑनलाईन क्लेम कसा करावा. Online Crop insurance claim 2023

ऑनलाईन पद्धतीने क्लेम ( Online Crop insurance claim ) करण्यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअर Google Play Store वर जाऊन क्रॉप इन्शुरन्स Crop Insurance नावाचे ॲप डाऊनलोड करायचे आहे.

Application link

वरती दिलेल्या लिंक वरून क्रॉप इन्शुरन्स Crop Insurance ॲप डाऊनलोड करू शकता.

पूर्ण पद्धत समजून घेण्यासाठी खालील सविस्तर माहितीचा व्हिडिओ पहा. Watch how to online claim

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन ( Crop Insurance Application ) ओपन झाल्यानंतर त्यामध्ये लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१) शेतकरी म्हणून नोंदणी करा ( Farmer Login )
२) नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा ( Guest Login )
वरीलपैकी एक पर्याय निवडून लोगिन करा.

क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये लॉगिन झाल्यानंतर पिक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीक नुकसान हा एक पर्याय दिसेल या पर्याय वरती क्लिक करा.

त्यानंतर पुढे पीक नुकसानीची पूर्वसूचना ( Crop loss intimation ) या पर्यायावर ती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका, मोबाईल नंबर वरती OTP पाठविला जाईल, आलेला ओटीपी टाका.

यानंतर आपण पिक विमा कुठून भरला म्हणजे स्वतः भरला की सीएससी सेंटर वरती भरला का बँक मध्ये भरला ही माहिती सादर करा. त्यानंतर आपला पिक विमा पावतीवरील पॉलिसी नंबर टाका आणि Done वर क्लिक करा.

त्यानंतर आपल्या पिक निवडून आपल्या झालेल्या नुकसानीची सर्व माहिती भरा. यानंतर नुकसानीचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा आणि विमा क्लेम सबमिट करा.

ऑफलाइन तक्रार

ऑफलाइन तक्रार देण्यासाठी आपले कृषी सहायक, तलाठी, तालुका कृषी अधिकारी, वीमा कंपनी अधिकारी, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक वर किंवा ई-मेलवर तक्रार देऊ शकता.

2 thoughts on “पिकांचं नुकसान झालंय, मग भरपाई साठी करा तात्काळ हे काम | pik vima claim 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *