सन २०२२ मध्ये अपेक्षेप्रमाणे नांदेड जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( nanded Kharip paisewari ) 50 पैशाखाली घसरली, सुधारित पैसेवारी जाहीर.
Nanded Kharip paisewari 2022 Sudharit
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला १५ सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष सुधारित पैसेवारी कडे लागले होते.
खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी ३१ ऑक्टोबरला जाहिर करण्याची पद्धत आहे, त्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी नांदेड श्री अभिजित राऊत यांनी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ( nanded kharip paisevari 2022 ) जाहिर केली आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित हंगामी पैसेवारीवर झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व 1562 गावांतील खरीप हंगामाची पीक पैसेवारी सरासरी पन्नासपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. नजर अंदाजे पैसेवारीही पन्नासपेक्षा कमी जाहीर करण्यात आली होती.
तालुकानिहाय पैसेवारी nanded Kharip paisewari 2022
नांदेड ४८ (८८), अर्धापूर ४८ (६४), कंधार ४७ (१२६), लोहा ४५ (१२७), भोकर ४९ (७७), मुदखेड ४९ (५५), हदगाव ४९ (१३७), हिमायतनगर ४७ (६४), किनवट ४७ (१९१), माहूर ४७ (९२), देगलूर ४८ (१०८), मुखेड ४९ (१३५), बिलोली ४७ (९१), नायगाव ४८ (८९), धर्माबाद ४८ (५६), उमरी ४९ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरीकरण झाले आहे.)
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
आता नांदेड जिल्ह्याची पैसेवारी ( nanded Kharip paisewari ) ५० टक्क्यांच्या आत आल्याने सर्व बाबींचा लाभ मिळण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते. परंतु, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य असल्याचे सांगण्यात येते.