MAITRI Scheme 2024 ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन maitri scheme 2024 अंतर्गत प्रशिक्षण, अर्ज मागविले.

maitri scheme

maitri scheme application 2024

राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतने व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

राज्यातील गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढण्यासाठी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढ होण्यासाठी ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेराजगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा आहे. यात 1 महिना क्लासरूम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश आहे. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयात तर प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय याठिकाणी घेण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maitri scheme applicant eligibility

अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होईल.

या योजनांतर्गत इच्छुक उमेदवारांनी 24 जानेवारी, 2024 ते 10 फेब्रुवारी, 2024 पर्यंत आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *