शेळी पालकांसाठी नवी योजना, शेळी समूह योजना | Goat Cluster scheme 2022

शेळीपालन व्यवसायाला एक नवी उभारी मिळवून देण्यासाठी १९ एप्रिल २०२२ रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) ही योजना राबविण्यास  मंजुरी देण्यात आली आहे. 

या योजनेबद्दल परिपूर्ण अशी माहिती या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) योजनेची पार्श्वभूमी

Goat Cluster scheme 2022
goat cluster scheme maharashtra

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळीपालन अनन्यसाधारण महत्त्व आहे, राज्यातील शेळीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाहिला जातो आणि एकंदरीत देशातील शेळ्यांची सांख्य हि साधारणपणे हि १४.८ कोटी इतकी आहे त्याच्या पैकी महाराष्ट्र मधील शेळ्यांची संख्या ही 1.6 कोटी  एवढी आहे.

राज्यांमध्ये अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना भटकंती करणारे समाज, भूमिहीन शेतमजूर यांच्या उपजीविकेचे प्रमुख व्यवसाय शेळीपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 48 लाख कुटुंबांना शेळीपालनाच्या माध्यमातून अर्थांजन होते.

राज्यातील एकूण शेळ्यांच्या संख्येपैकी साधारणपणे 76 % संख्या स्थानिक जातीच्या शेळ्याची आहे यामध्ये त्यांची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.  शेळीपालन व्यवसाय मध्ये पशुपालक संघटित नसल्यामुळे त्यांना व्यवस्थित व्यावसाय करता येत नाही, शेळ्यांची दिशाहीन पैदास, अन्नाची कमतरता शेळी पालकांचे व्यवसायातील सुधारित पद्धतीबाबतचे अज्ञान, शेळ्यांची असंघटित विपणन व्यवस्था चाऱ्याची कमतरता अशा प्रकारच्या कारणांमुळे शेळी पालकांना या व्यवसायात फायदा होत नाही, याचप्रमाणें नैसर्गिक आपत्ती अचानक येणारी इतर संकट यामुळे हे शेतकरी आपल्या शेळ्या जवळच्या बाजारांमध्ये अगदी कवडीमोल भावामध्ये  विकतात.

या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता या पशु पालकांना एका प्लॅटफॉर्म वर आणून शेळीपालन व्यवसायास उभारी देण्यासाठी 16 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि याच अनुषंगाने आज एक शासन निर्णय ( Govt GR )  घेऊन हि शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) राबविण्याचा उद्देश

राज्यामध्ये समूह विकासतुन  शेळीपालन व्यवसाय, शेळीपालन व्यवसायसंबंधित नवीन उद्योजक निर्माण करणे, शेळी पालकांचे उत्पादक कंपनी, फेडरेशन संस्था निर्माण करणे व त्यांच्या माध्यमातून शेळीपालन प्रशिक्षण,  शेळीपालन व्यवसाय करता लागणाऱ्या सुविधा पुरविणे, शेळी पालन  तंत्रज्ञान विकसित करणे, शेळी पालन करता विक्री साठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा विविध बाबींचा विकास केला जाणार आहे.

शेळी पालकांना दूध , मांस, शेळ्या, बोकड यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे , दूध प्रक्रिया उद्योग,  पशुखाद्य कारखाने, निर्यात सुविधा अशा पायाभूत सुविधा या योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित योजनेच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आलेले आहे

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार निर्मिती करणं, शेळ्यांच्या पैदास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे अशा प्रकारचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत

शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) कार्यक्षेत्र

शेळी समूह योजना ठिकाण मौजे पोहरा तालुका जिल्हा अमरावती आणि  कार्यक्षेत्र असणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, तर  नागपूर, वर्धा, आणि हिंगोली या जिल्ह्यांचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणं अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.

तर इतर ५ ठिकाणा साठी तत्त्वतः मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये

  • मौजे बोन्द्री  तालुका रामटेक जिल्हा नागपूर –  या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हे या योजनेचे क्षेत्र असणार आहे.
  • मौजे तीर्थ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद – औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली,नांदेड, लातूर, आणि उस्मानाबाद कार्यक्षेत्र असणारे आहे.
  • मौजे रांजणी ता कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांच्या अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर या क्षेत्राचा समावेश आहे.
  • मौजे बीलाखेड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर
  • मौजे तलासरी  जिल्हा पालघर या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गआणि रत्नागिरी

या पाच ठिकाणी हि योजना राबविण्यास  या शासन निर्णयाच्या माध्यमातून तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे.

शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) या योजनेअंतर्गत समाविष्ट बाबी

पोहरा येथे पशुसंवर्धन विभागाची  साडेनऊ एकर जमीन आहे , या जमिनीवर प्रोजेक्ट प्रकल्प उभारला जाणार आहे

या जमिनी पैकी दोन एकर क्षेत्रावर सामूहिक सुविधा केंद्र उभारले जाणार आहे, क्षेत्रात शेळीपालन व्यवसाय सुरू करण्या करता प्रोत्साहन देणे, उत्पादक कंपन्या स्थापन करणे, महाराष्ट्रातील या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये किमान ३०,००० शेतकऱ्यांना पशुपालकांना या व्यवसायासाठी  प्रोत्साहित करण्यात येईल त्यासाठी त्या भागामध्ये सर्वेक्षण करून व्यवसायासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करून घेतली जाईल आणि त्यांना शेळीपालन प्रशिक्षण देण्यात येईल. शेळीपालनाच्या संबंधातील ट्रेनिंग, ट्रेनिंग साठी  शंभर प्रशिक्षणार्थी राहू शकतील अशा प्रकारचे निवासस्थान, कर्मचार्‍यासाठी निवास्थान अशा प्रकारच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

तर अडीच एकर क्षेत्रावरती शेळ्यांचे दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहेत

या जमिनीपैकी दीड एकर जमिनीवरती शेळ्यांचे मांस प्रक्रिया उद्योग केंद्र स्थापन केलं जाणार आहे .

तर उर्वरित ०.५  एकर जमीनवरती उत्पादक कंपन्या व खाजगी व्यवसाय करता कार्यालय उभारण्यात येईल

शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) या योजनेअंतर्गत समाविष्ट बाबी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा देखील निश्चित करण्यात आलेली. यासाठी एक समिती नेमण्यात आली आली आहे यात प्रधान सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील.

या शेळी समूह योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात  या जिल्ह्यांमध्ये तीस हजार शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्या माध्यमातून शेळीपालन व्यवसाय करता प्रोत्साहित केले जाणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शेळी पालकांना शेळी विक्री च्या वेळेस निर्माण होणाऱ्या समस्या देखील या ठिकाणी सुटणार आहेत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध  असलेल्या शेळ्यांना निश्चित व जास्त किमंत मिळून त्यांचे उत्पादन वाढीवर यामुळे परिणाम होणार आहे. याच प्रमाणे शेळ्या पासून मिळणारे दूध, मांस, विविध पदार्थ उपपदार्थ यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यात एणार असल्याने नवीन उद्योजक निर्माण होतील, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याचा देखील फायदा शेळी पालकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारची हि योजना राबविण्याकरिता  आज 19 एप्रिल 2020 रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे, शासन निर्णय खालील लिंक वर पहा. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या 6 प्रक्षेत्रावर शेळी समूह योजना (Goat Cluster scheme) राबविण्यास मान्यता देण्याबाबत.

हे हि पहा

watch how to apply NLM udyamimitra yojana

1 thought on “शेळी पालकांसाठी नवी योजना, शेळी समूह योजना | Goat Cluster scheme 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *