ई पीक पाहणी ( E Pik Pahani 2022 ) ची तारीख ठरली, Pik vima ई पीक पाहणी ची भरताना सक्ती नाही
पीक विमा भरताना ई पीक पाहणी सक्तीची नाही – राज्याचे कृषीआयुक्त धीरज कुमार यांच्या माध्यमातून अनेक प्रेस नोट काढून याच्या संदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आलेला आहे.
मित्रांनो आपण जर पाहिलं तर पिक विमा भरायचं असेल तर पाहणी करावी, ई पीक पाहणी केली असेल तरच पिक विमा मिळेल, आणि ईपीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा भरू नये अन्यथा तुमच्या सीएससी सेंटर बंद केले जातील अशा प्रकारचे काही नोटीस काही तहसीलदारांच्या माध्यमातून काडण्यात आल्या होत्या.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्था निर्माण झालेली होती की ई पिक पाहणी ( E pik pahani ) करायची तरच पिक विमा भरायचा.
याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आज 15 जुलै 2022 झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांना पिक विमा भरता आलेला नव्हता आणि ई पीक पाहनी ही करता येत नव्हते आणि याच्या संदर्भातील खूप मोठ्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या जात होत्या.
या सर्वांच्या पार्श्वभूमी वर आज राज्याचे कृषी आयुक्त श्री धीरज कुमार यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून माहिती देण्यात आली आहे.
E pik pahani project 2022
मात्र शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणीचा प्रोजेक्टची अंमलबजावणी राज्यामध्ये एक ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे.
त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सध्या स्वयंघोषित पिक पेरा जोडून पिक विमा भरायचा आहे आणि एक ऑगस्ट 2022 रोजी ज्यावेळेस ई पीक पाहणी सुरू होईल तेव्हा ई पीक पाहणी करावयाची आहे.
शेतकऱ्यांना आपली पिक पेरा पिक पाहनी ( E pik pahani ), पीक विमा भरलेले पीक व शेतातील पीक हे साम्य असावं लागणार आहे.
कारण आपण जर पाहिलं तर पिक विमा भरत असताना लावलेले पीक आणि शेतामध्ये प्रत्यक्ष असलेले पीक याच्यामध्ये तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यापासून वंचित ठेवला जात याच्यामुळे आता शेतकरी जे पिक विमा भरतील त्यांना ई पीक पाहणीला आपले तेच पीक नोंद करायचे आहे.
याच पार्श्वभूमी वरती ही शासन निर्णयात टाकण्यात आलेली आहे तर आपण 2022 साठी ची ई पीक पाहणी सुरू झाल्यानंतर आपली पीक पाणी नोंद करू शकता आणि सध्या स्वघोषित केलेल्या पीक पेरा च्या आधारे पिक विमा भरू शकता.
#Epikpahani2022