Anganwadi Bharti 2023 अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित Anganwadi Bharti 2023, पहा काय आहेत अटी शर्ती पात्रता मानधन सविस्तर

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023 अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज आमंत्रित

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक- एबासवि – २०२२ / प्र.क्र.९४/का-६ दिनांक २ फेब्रुवारी २०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरूस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगांव, जि.नाशिक यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनिस भरती प्रक्रिया सन २०२२-२०२३ साठी महानगरपालिका मालेगांव व नगरपालिका सटाणा शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनिस रिक्त पदांसाठीअनुक्रमे रु.८३२५/- प्रति महिना रु.४४२५/- प्रति महिना असे एकत्रित मानधनी तस्यावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी मालेगांव व सटाणा शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

Anganwadi sevika bharti

अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्तीसंदर्भात ( ANGANWADI BHARTI 2023 ) आवश्यकत शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती, खालीलप्रमाणे आहे.

anganwadi sevika eligibility

अंगणवाडी मदतनीस कामाचे स्वरूप अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी स्वच्छता करणे, पिण्याचे पाणि भरणे, लाभार्थ्यांना अंगणवाडीत | बोलावणे, अंगणवाडी सेविकांचे निर्देशाप्रमाणे कामे पार पाडणे इत्यादी.

अंगणवाडी सेविका व मदतनिस पदासाठी अर्जदार किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इ.१२ बीचे गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. यापेक्षा उच्चत्तम शैक्षणिक अर्हता धारण करणा-या उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सादर कराव्यात.

वास्तव्याची अट उमेदवार हा स्थानिक रहीवाशी असावा. (स्थानिक रहीवाशी बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

anganwadi sevika age limit

वयाची अट जाहिरात प्रसिदधीचे दिनांकास किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील.

लहान कुटुंब उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये,
उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह ) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामूक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य (दत्तक दिलेल्या अपत्यासह) असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा समाप्त करण्यात येईल.

भाषेचे ज्ञान मराठी भाषा ( उमेदवाराने इयत्ता १० वी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे)

रिक्त पदांचा तपशिल दर्शविणा-या तक्ता अव व क मधील सर्व सेविका व मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणान्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. रिक्त पदे दर्शविणा-या तक्ता अ मधील मालेगांव शहरातील अनुक्रमांक १,२,३,४ व तक्ता व मधील मालेगांव शहरातील अनुक्रमांक १४ ते ६४ या अंगणवाडी केंद्रात ५०% पेक्षा जास्त मुले मराठी भाषाव्यतिरिक्त हिंदी/उर्दू भाषा बोलणारी असल्याने सदर अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनिस पदासाठी अर्ज करणा-या महिला उमेदवारांना मराठी भाषेसोबतच हिंदी/उर्दू भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) असणे आवश्यक आहे. तथापि अशा उमेदवाराने इ.१० वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.

विधवा / अनाथ उमेदवारांबाबत विधवा व अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

बदली – अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामूळे तसेच स्थानिक रहीवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.

मागासवर्ग प्रवर्ग , अनु जाती / अनु जमाती / इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / विशेष मागासप्रवर्ग या उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडावे.

अनुभव शासकिय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका / मदतनीस / मीनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

जाहिरात प्रसिदधी अर्ज स्विकारण्याचा दिनांक 09 मार्च 2023

जाहीरात प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून १० कार्यालयीन कामकमाजाचे अंतिम दिनांक दिवसापर्यत व कार्यालयीन वेळेपर्यत. (दि 23/03/2023 पर्यंत)

प्राथमिक यादी यादीस हरकती

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांकापासून १५ दिवस (कार्यालयात / नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. कार्यालयात / नोटीस बोर्डवर प्रसिध्द झाल्यापासून पुढील १० दिवसापर्यंत.

भरतीची पुर्ण कार्यवाही जाहीरात प्रसिध्द केल्यापासून ९० दिवसात प्रतिक्षा यादी.

जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरविण्यात आले तर प्रतिक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहिर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहील.

प्राथमिक गुणानुक्रम यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तीक माहिती खोटी असल्याची अर्ज केलेल्याउमेदवारांची तक्रार असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक १ यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.

निवड यादी घोषित झाल्यापासून ३० दिवसाच्या आत मा. विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास नाशिक विभाग नाशिक यांचे कडे अपिल दाखल करता येईल.

कागदपत्राच्या प्रती अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून सांक्षाकित केलेल्या असाव्यात. जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुण्यातीलच अर्ज करावा.

अंगणवाडी सेविका भरती, अंगणवाडी मदतनीस भरती अर्ज नमुना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: