Van Hakka 7/12 या शेतकऱ्यांना खुशखबर! पिककर्ज, पीकविमा कृषी योजनांचा लाभ मिळणार

Van Hakka 7/12 राज्यातील लाखो वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा, आता पिककर्ज, पीकविमा सह कृषी योजनांचे लाभ मिळणार. मिळणार हक्काचा सातबारा

Van Hakka 7/12

Van Hakka 7/12

राज्यातील लाखो आदिवासी वनपट्टाधारकांना शासनाने  ७ ई व १२ ई नमुने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यासंदर्भात एक शासन निर्णय 10.07.2026 रोजी घेतला आहेया निर्णयाचा सुमारे २ लाख आदिवासी कुटुंबांना लाभ होणार असून, हा निर्णय त्यांना अधिक सक्षम, सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करणारा ठरणार आहे.

राज्यात वनहक्क धारक शेतकऱ्यांची नोंद 7/12 वर इतर हक्कात केली जाते यामुळे या वनहक्क धारक शेतकऱ्यांना पिक कर्जासह कृषी योजनांचे लाभ मिळत नाहीत. याच अनुषंगाने या शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आता या शेतकऱ्यांची नोंद सातबारा सदरी घेतली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची वनहक्क धारक म्हणून इतर हक्कात नोंद असेल अशा शेतकऱ्यांची नोंद नमुना 7 ई ला तर पिकांची नोंद नमुना 12 ई ला करण्यात येणार आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

तर ज्या वनक्षेत्राचे अद्याप 7/12 अभिलेख उपलब्ध नाहीत अशा क्षेत्राचे 31 डिसेंबर 2026 पर्यंत वन विभाग व महसूल विभाग संयुक्तिक सर्वेक्षण करून 7/12 तयार केले जाणार आहेत.

याचबरोबर 7/12 उपलब्ध नसलेल्या व वनपट्ट्यावर कंपार्टमेंट क्रमांक असलेल्या ठिकाणी वन विभागाने अभिलेख विभागाकडे जमाबंदीचा प्रस्ताव सादर करून या प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे.

या सर्व नोंदी घेतल्या जात सातबारा वर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ कलम ४(१) अन्वये प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही असा शेरा लावला जाणार आहे.

यामुळे या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.

GR PDF

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012 नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या 7/12 सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड 4 मध्ये गाव नमुना 7-ई व नमूना 12-ई चा नव्याने समावेश

#VanHakkaGR2026 #वनहक्ककायदा