Shetkari Karjmafi जिल्ह्यात 57 हजार खात्यांची माहिती अपलोड

shetkari Karjmafi शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आणलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये जिल्ह्यात ५७ हजारहून अधिक कर्ज खात्याची माहिती अपलोड.

Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi yojana Sangali jilha update

गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांची कर्जमाफी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन पर अनुदान याचबरोबर थकबाकीदार असलेल्या दोन लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना असे योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या योजनेच्या अंतर्गत अंमलबजावणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये सांगली जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सांगली जिल्ह्यातील 56 हजार 962 शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती पोर्टल वरती अपलोड केलेली आहे.

या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 57,112 खात्यांचे ऑडिट आतापर्यंत करण्यात आलेले असून ऑडिट झालेल्या 99.74% खात्याची माहिती बँकांच्या माध्यमातून पोर्टल वरती अपलोड करण्यात आलेले आहे याच्यामध्ये जिल्ह्यातील केवळ 150 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकी आहे. यामध्ये शेतकऱ्याचा आधार कार्ड उपलब्ध न होणं याच प्रमाणे मयत वारसाची माहिती उपलब्ध न होणे यासाठी 150 खाती माहिती अपलोड करण्यापासून बाकी आहे त.

यामध्ये खानापूर आणि तासगाव या तालुक्यामधून शंभर टक्के माहिती अपलोड करण्यात आलेली असून आटपाडीमध्ये 99.91% जत तालुक्यात 99.75% मिरज तालुक्यात 99.95% वाळवा 97.92% कडेगाव 99.94% पलूस 99.97% शिराळा 99.87% कवठेमहाकाळ 99.92% अशा प्रकारे आतापर्यंत बँकांच्या माध्यमातून माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.

प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये वाळवा तालुक्यातील 94 शेतकऱ्यांची माहिती अद्याप पर्यंत अपलोड करण्यात आलेली नाही ज्याच्यामध्ये 91 मयत वारसाची कागदपत्र पूर्तता न केल्यामुळे तर जत तालुक्यातील 41 प्रकरण ज्याच्यामध्ये 38 प्रकरण ही मयत वारसाची माहिती पूर्ण न केल्यामुळे प्रलंबित आहेत व इतर प्रकरणांमध्ये आधार कार्ड उपलब्ध नसल्या कारणाने त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांनी या प्रक्रियेमध्ये विलंब होऊ नये यासाठी आपला आधार, फार्मर आयडी याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे मयत खातेदार असतील त्यांनी वारसाची माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावे असा आवाहन करण्यात आला आहे.

punyashlok ahilyadevi holkar shetkari karj mukti yojana 2026