Skip to content
cropped grnsheti.jpggrnsheti text
Gr N Sheti Yojana
  • Home
  • About
  • Privacy Policy
STAY UPDATED
STAY UPDATED
cropped grnsheti.jpggrnsheti text
Gr N Sheti Yojana
STAY UPDATED
STAY UPDATED
  • WordPress
  • Home
  • About
  • Privacy Policy

MahaDBT Masala Pik 50% अनुदानावर हळद, मिरची आणि मसाला पिके अनुदान; ऑनलाइन अर्ज सुरू!

/ New Updates

50% अनुदानावर हळद, मिरची आणि मसाला पिके अनुदान; ऑनलाइन अर्ज सुरू! लागवडीला अनुदान किती दिल जात? अर्ज कशाप्रकारे करायचा? पात्र कोण असणार? कोणते कोणते कागदपत्रे लागणार? योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती.

MahaDBT Masala Pik

MahaDBT Masala Pik Anudan 2026

भारत जगात मसाल्याचा देश म्हणून ओळखला जातो जगात सर्वात जास्त मसाला पिकाचे उत्पादन हे भारतात घेतले जातं आणि याच मसाला उत्पादनामध्ये वाढ व्हावे शेतकऱ्यांना पारंपारिक शेती व्यतिरिक्त एक चांगलं उत्पादन करण्याचा मार्ग मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये मसाला पिके ज्याच्यामध्ये मिरची आले, हळद काळीमिरी, लवंग दालचिनी अशाच पिकाची लागवड करण्यासाठी अनुदान दिले जाते.

याच्या संदर्भात राबवल्या जाणारे योजनेच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये. लागवडीला अनुदान किती दिल जात? अर्ज कशाप्रकारे करायचा? पात्र कोण असणार? कोणते कोणते कागदपत्रे लागणार?

MahaDBT Masala Pik Anudan योजना राबविण्याचा उद्देश

राज्यामध्ये ही योजना राबवली जात असताना मसाला पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ करणे, लहान सीमांत शेतकऱ्याला मसाला पिकाची शेती करण्यासाठी अनुदान देणं,  ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती याचबरोबर मसाला पिकांवरती प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन, राज्यातील  निर्यातक्षम मसाला पिकाचे उत्पादन वाढवणे असे अनेक उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवली जात आहे.

MahaDBT Masala Pik Anudan पात्रतेचे निकष

या योजने करता लाभार्थ्याला पात्रतेसाठी त्याच्याकडे किमान स्वतःची वीस गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत मसाला पिकाची लागवड पूर्णपणे नव्याने करणाऱ्या शेतकऱ्यालाच या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेमध्ये अनुदान दिलं जातं. जर एखाद्या शेतकऱ्याने गेल्या पाच वर्षांमध्ये या पीक लागवडीचा लाभ घेतला असेल आणि तो दोन हेक्टरचा असेल तर त्या शेतकऱ्याला नव्याने लाभ दिला जाणार नाही.

मात्र त्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रावर ती लागवड केलेली असेल तर त्या शेतकऱ्याला उर्वरित क्षेत्रासाठी लाभ दिला जातो पुढील पाच वर्षापर्यंत एकदा लाभ घेतल्यानंतर या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.

लागवडीला अनुदान किती दिल जात?

MahaDBT Yojana Masala Pike Anudan या योजनेअंतर्गत बी वर्गीय मसाला पिके ज्याच्यामध्ये मिरची किंवा इतर पिकांसाठी मंजूर मापदंड हा 50 हजार रुपये प्रति हेक्टर एवढा निश्चित करून याच्या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी 40% अर्थात प्रति हेक्टर 20000 रुपये तर अनुसूचित क्षेत्रासाठी 50% अर्थात 25 हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं.

कंदवर्गीय मसाला पिके अर्थात आले हळद इत्यादी पिकांसाठी या योजनेअंतर्गत मंजूर मापदंड हा प्रति हेक्टर एक लाख रुपये एवढा निश्चित करून सर्वसाधारण क्षेत्रासाठी 40% अर्थात चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिला जातं तर अनुसूचित क्षेत्रासाठी प्रकल्प खर्चाच्या 50% अर्थात 50 हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जात.

याच प्रमाणे बहुवार्षीय मसाला पिकअप याच्यामध्ये काळी मिरी लवंग जायफळ दालचिनी किंवा इतर जे काही मसाला पीक असतील याच्यासाठी प्रकल्प खर्च हा एक लाख रुपये निश्चित करून याच्या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी 40% अर्थात चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं तर अनुसूचित क्षेत्रासाठी 50% अर्थात 50 हजार रुपये प्रति हेक्टर एवढा अनुदान दिले जात.

MahaDBT Masala Pik Anudan आवश्यक कागदपत्र

MahaDBT Yojana Masala Pike Anudan या योजनेअंतर्गत पात्र झाल्यानंतर शेतकऱ्यांना दोन टप्प्यात कागदपत्र अपलोड करावे लागतात एक तर पात्र झाल्यानंतर आणि दुसरी पूर्वसंमती मिळाल्यानंतर.

याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा अर्ज करताना घेतलेला असतो त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड सातबारा उतारा आठ याच्यानंतर आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जात प्रवर्गातून अर्ज असेल तर जातीचे प्रमाणपत्र सातबारा जर सामाईक असेल तर इतर खातेदाराचे संमती पत्र याचबरोबर विहित नमुन्यातील एक हमीपत्र ही कागदपत्र लागताता.

तर पूर्वसंमती मिळाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत जे काही खरेदी केलेली चलन असतील की बिल चलन दुसऱ्या टप्प्यांमध्ये अपलोड करावे लागतात.

अर्ज कशाप्रकारे करायचा?

या योजने करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल ची माहिती खालील व्हिडिओमध्ये देण्यात आलेले तो व्हिडिओ पाहून आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

MahaDBT Yojana Masala Pike Anudan ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे महाडीबीटी फार्मर स्कीम चे पोर्टल आहे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या ऑनलाइन संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना अर्ज करता येतो याच्या अंतर्गत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरती ही योजना राबवली जात आहे.

एमआयडीएच-स्पाईस क्रॉप गाईडलाइन-2025-26 MahaDBT Yojana Masala Pike Anudan MIDH Spice Crop Guidelines 2025-26

PDF

masala pike hamipatra
masala pike esimate
mirchi lagvad estimate
halad lagvad estimate
adrak lagvad estimate

Share this:

  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on X (Opens in new window) X

Related

← Previous Post

Related Posts

paisevari

Paisevari 2025 या जिल्ह्यांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर

Leave a Comment / New Updates / By sprabha0504
ativrushti anudan

Ativrushti Anudan हो तरच मिळणार अनुदान

1 Comment / New Updates / By sprabha0504

Recent Posts

  • MahaDBT Masala Pik 50% अनुदानावर हळद, मिरची आणि मसाला पिके अनुदान; ऑनलाइन अर्ज सुरू!
  • Ativrushti bharpai 2025 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पॅकेज जाहीर
  • OTS Scheme 2026 सोसायटीच्या थकीत पिककर्जासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’
  • NBS Scheme 2026 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: केंद्राचा मोठा निर्णय
  • Mahavitaran IPO महावितरण कंपनी शेअर बाजारात एंट्री; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025

Categories

  • New Updates
  • Pikvima

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Copyright © 2026 Gr N Sheti Yojana | Powered by Gr N Sheti Yojana