स्कायमेट वेदर कंपनीच्या अंदाजानुसार दुष्काळाचे सावट, अल निनोचा प्रभाव राहणार पहा कसेल पावसाळा. कोणत्या भागात कसा राहील पाऊस Skymet Monsoon Forecast 2026

Skymet Monsoon Forecast 2026 Declared
स्कायमेट वेदर ने वर्तविलेल्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट महिन्यासाठी मान्सूनची शक्यता खालीलप्रमाणे असणार आहे.
- ११०% पेक्षा जास्त अर्थात अतिरिक्त पावसाची शक्यता ०%
- सामान्यपेक्षा जास्त अर्थात १०५ ते ११०% पावसाची शक्यता १०%
- सामान्य पावसाची अर्थात ९६ ते १०४% शक्यता २०%
- सामान्यपेक्षा कमी अर्थात ९० ते ९५% पावसाची शक्यता ४०% आहे.
- यामध्ये दुष्काळाची शक्यता अर्थात ९९% पेक्षा कमी पर्जन्यमान ची शक्यता ३०% आहे.
पावसाळ्यातील महिन्यानुसार अंदाज पाहिला तर
जून मध्ये पाऊस LPA च्या १०१% इतका राहू शकतो. यामध्ये सामान्य पावसाची शक्यता ७०%, सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता १०%, सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता २०% आहे
जुलै महिन्यासाठी हे प्रमाण ९५% इतके वर्तविण्यात आले आहे.यामध्ये ४०% शक्यता सामान्य, सामान्यपेक्षा जास्त होण्याची २०% शक्यता, सामान्यपेक्षा कमी होण्याची ४०% शक्यता.
ऑगस्ट मध्ये एलपीएच्या ९२% पाऊस राहील. यात सामान्य पावसाची २०% शक्यता, सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता, तर सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ६०% शक्यता आहे.
तर सप्टेंबर मध्ये एलपीएच्या ८९% इतका पाऊस पडेल यामध्ये सामान्य पावसाची २०% शक्यता, सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची १०% शक्यता, तर सामान्यपेक्षा कमी होण्याची ७०% शक्यता आहे.


