ई पीक पाहणी – का, कधी, कशी करायची | E peek pahani 2023

सन 2023 च्या खरिप हंगामासाठी 1 july 2023 पासून E peek pahani 2023 सुरू होत आहे, मात्र नेमकी ई पीक पाहणी का करायची, कशी, कधी करायची घेऊयात जाणून.

E peek pahani 2023

सोप्पी व सुलभ ई-पीक पाहणी सुधारित मोबाईल ऍपमध्ये – E peek Pahani 2023

ई-पीक पाहणी हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 2 वर्ष पूर्ण झाले आहे. गतवर्षीपासून सुमारे १ कोटी ११ लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल  ई-पीक पाहणी इ पीक पाहणी ऍपद्वारे नोदणी केली आहे.

२०२३ साठी ई – पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ आहे.

सन २०२१ मध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या आपल्या पिकांची नोंदणी pik pera करून या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.

गतवर्षी खरीप हंगामा ( kharip 2022 ) मध्ये ९९ लाख ५७ हजार ९४४ हेक्टर, रब्बी हंगामामध्ये २२ लाख, ५२ हजार ५६ हेक्टर, उन्हाळी हंगामामध्ये २ लाख ९१ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर तर बहुवार्षिक पिकांतर्गत ४४ लाख १२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍप ( E pik pahani application ) द्वारे पिकांची नोंदणी केली आहे.

त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी ऍप ( E-peek pahani ) द्वारे  ४०० च्यावर वेगवेगळ्या पिकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या असून खरीप हंगाम 2023 करीता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल अँप्लिकेशन नोंदविण्याची कार्यवाही 1 july 2023 पासून सुरु होत आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या 2022 मधील  वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशन काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून हे E pik Pahani New Version अप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ करण्यात आलेले आहे.

या साठी मोबाईल ऍप्लिकेशन व्हर्जन-२.0.11 विकसित  हे सुधारित E peek Pahani New Version – E peek pahani 2.0.11 मोबाईल एप्लिकेशन  1 july 2023 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

E-Peek Pahani 2.0.0.11 ई-पीक पाहणी Application Link

ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे.

सुधारित मोबाईल अॅपमध्ये ( E pik Pahani New Version ) राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट ( geo tagging ) करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत माहितीमध्ये स्वयंघोषणापत्र ( Self decleration ) घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० % नोंदीची पडताळणी ( Crop verification )तलाठ्यांमार्फत करण्यात येणार असून  तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. तलाठी यांच्यामार्फत तपासणी केल्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.

ई-पीक पाहणी दुरुस्त

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशन केलेली पीक पाहणी E peek Pahani 2023 ४८ तासामध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.

किमान आधारभूत योजनेअंतर्गत ( MSP hamibhav yojana ) येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ( Hamibhav kharedi ) अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

या पूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये ( E pik pahani old application )असलेल्या मुख्य पीक ( Main Crop ) व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधे ऐवजी तीन दुय्यम पिके  नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक ( Pik pera date ) , हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी कार्यालयाकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये ‘मदत’ ( E-peek pahani Helpdesk ) हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न ( E peek pahani FAQ )व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत.  याचा वापर करून शेतकरी अॅप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.

प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा ( pikvima – Crop insurance ) , व पीक विमा दावे ( Crop insurance claim ) निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप ( Crop loan ) , नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.

खरीप हंगाम 2023 चे पीक पाहणींची कार्यवाही 1 july 2023 पासून सुरु होत आहे. यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप E peek pahani 2.0.11 व्हर्जन-२ गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल अॅप E pik Pahani New Version ( E peek pahani 2.0.11 ) आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण केल्यास त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: