पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ( AHIDF 2022 ) योजनेची पार्श्वभूमी.
ग्रामीण भागासह देशातील पशू पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने सन 2021या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ( AHIDF 2022 ) या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान केलेली आहे आणि याच महत्वपूर्ण योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ( AHIDF 2022 ) या योजनेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सादर केलेल्या 2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ( Union Budget 2021) मध्ये 2021 -22 या वर्षाकरिता सुमारे ₹ १५,००० कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ( AHIDF 2022 ) योजनेची उदिष्ट
या योजनेअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील दूध आणि मांस प्रक्रिया ची क्षमता वाढविणे तसेच या उत्पादनाचे विविधीकरनाद्वारे असंघटित ग्रामीण भागातील दूध आणि मांस उत्पादकांना संघटित करून दूध आणि मांस मार्केटमध्ये त्यांना अधिकधिक प्रवेश मिळवून देणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
याच बरोबर देशांतर्गत घरगुती ग्राहकांसाठी दर्जेदार दूध आणि मांस याची उपलब्धता वाढविणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
याचबरोबर मांस व दुधाच्या निर्यातीला चालना देणं, ग्रामीण भागातील गुरेढोरे, म्हैस, मेंढ्या, शेळी, डुक्कर आणि कोंबडी यांना परवडणाऱ्या किमतीत संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी दर्जेदार पशुखाद्य निर्मिती ला प्रोत्साहन देणे, दर्जेदार पशुखाद्य उपलब्ध करून देणे अशी महत्वाची उदिष्ट पशू पालन पायाभूत सुविधा निधी AHIDF 2022 या योजेनेअंतर्गत ठेवण्यात आलेली आहेत.
AHIDF 2022 अंतर्गत समाविष्ट घटक
सदर योजनेअंतर्गत खालील ४ वर्गवारीतील विविध प्रक्रिया/ उत्पादन/ संवर्धन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
AHIDF 2022 या योजनेअंतगधत दूध व दुग्ध जन्य पदार्थ प्रक्रिया (आईस्क्रिम, चीज वनर्ममती, दूध पाश्चराईजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मित्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाला या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, अनुदान स्वरूपात या कर्जावरील व्याज दरामध्ये ३ टक्के इतकी सुट देण्यात येणार आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग
१. आईस्क्रीम निर्मिती युनिट
२. चीज उत्पादन युनिट
३. उच्च तापमान दूध निजंतूकीकरण युनिट ( पॅकिंग च्या सुविधेसह)
४. सुगंधी दूध उत्पादन प्रक्रिया युनिट
५. दूध पावडर उत्पादन युनिट
६. व्हिटॅमिन पावडर उत्पादन युनिट
७. इतर दुग्धयोजन्य पदार्थ निर्मिती युनिट
मांस प्रक्रिया उद्योग
- ग्रामीण निमशहरी व शहरी भागात शेळी/ मेंढी/ कुक्कुट/ म्हैस वर्गीय पशुधनाच्या मांस प्रक्रिये करिता नवीन युनिटची स्थापना.
- मांस साठवण्याकरिता शीत गृह उभारणी, मासातील सुक्ष्म जीव जंतू तपासणी प्रयोगशाळा, मांस प्रक्रियेतील उप उत्पादनाच्या योग्य विल्हेवाटीकरिता युनिट उभारणे इत्यादी
पशुखाद्य निर्मिती उद्योग
- लघु व मध्यम व उच्च पशुपक्षी खाद्य निर्मिती केंद्र
- टोटल मिक्स रँशन (टीएआर) ब्लॉक मेकिंग युनिट
- बायपास प्रोटीन युनिट
- खनिज मिश्रण उत्पादन केंद्र
- मुरघास निर्मिती केंद्र
- खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा इत्यादी बाबीचा यात समावेश आहेत
पशु सवर्धन व संशोधन
- लिंग विनिच्छित विर्यमात्रा निर्मिती
- बाह्य भलन केंद्र (आय व्ही एफ)
- पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन
AHIDF 2022 पात्र लाभार्थी
- शेतकरी उत्पादक संघ
- खाजगी संघ / संस्था
- वैयक्तिक पशुपालक
- लघु व मध्यम उद्योग
- व्यक्तिगत उद्योग
- सेक्शन 8 अंतर्गत स्थापन कंपनी हे सर्व या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत.
AHIDF 2022 अंतर्गत अपात्र लाभार्थी
- शासकीय संस्था
- सहकारी संस्था
- निम शासकीय संस्था या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असणार नाहीत
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी AIHDF 2022 अर्ज प्रक्रिया
पशुपालन पायाभूत सुविधा निधी योजनेच्या अर्थसहहाय करिता वरील व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे अर्ज करावा
१. हा अर्ज ऑनलाईन अर्ज पद्धतीने असेल.
२. पोर्टलचे नांव http://dahd.nic.in/ahdf
३. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in
आपणास या व्यतिरिक्त माहिती साठी AHIDF योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी ही सर्व माहिती आपणास केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://dahd.nic.in/ahdf उपलब्ध आहेत.
अशा प्रकारच्या या महत्वपूर्ण योजनेमुळे राज्यातील पशुपालकांना दूध, दुग्ध जन्य पदार्थ, मांस , पशुखाद्य निर्मिती सारख्या उद्योगाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
याचबरोबर फक्त शेळी पालन ( Sheli palan ), कुक्कुटपालन ( Poultry farming) किंव्हा वराह पालन करायचे असेल तर यासाठी अनुदानाच्या योजनेसाठी हे नक्की पहा