NLM Scheme राज्यात पशुधन विमा योजना लागू

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा योजना लागू, शेतकऱ्यांना मिळणार 85 टक्के प्रीमियम अनुदान  NLM Scheme 2026

NLM Scheme

NLM Scheme 2026 AHD insurance scheme

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या एन एल एम अर्थात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यांमध्ये पशुधन विमा योजना राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून 5 ऑगस्ट 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनांचे नैसर्गिक आपत्ती रोगामुळे जर नुकसान झाले त्या पशुधनाचा मृत्यू झाला तर अशा पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी या योजनेच्या अंतर्गत मोठा दिलासा मिळणार आहे.

पशुधनांना नैसर्गिक आपत्ती विषबाधा सर्पदंश दूषित पाणी अपघात याच प्रमाणे लंबी सारख्या आजारामुळे होणारे पशुधनांचा नुकसान या सर्व नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या पशुधन विमा योजनेअंतर्गत राज्यातील देशी संकरित दुधाळ गाई म्हशी बैल रेडे शेळ्या मेंढ्या इत्यादींना विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रतिक कुटुंब दहा पशुधन घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळणार असून त्यापेक्षा अधिक पशुधनाचा विमा काढावयाचा असेल तर संपूर्ण प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.

पशुधन विमा योजनेअंतर्गत दुधाळ गाई साठी 70000 रुपये मशीसाठी 80 हजार रुपये बैलासाठी 70000 रेड्यासाठी 80 हजार रुपये शेळी अथवा मेंढीसाठी सात हजार रुपयापर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आपल्या इच्छेनुसार एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्षासाठी विमा घेता येणार आहे विमा प्रीमियम चा दर एका वर्षासाठी 4.30% दोन वर्षासाठी 7.50% तर तीन वर्षासाठी 10.50% इतका निश्चित करण्यात आलेला आहे. या प्रीमियम पैकी 85% हिस्सा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपामध्ये दिला जाणार असून शेतकऱ्यांना 15% रक्कम स्वहिस्सा भरावा लागणार आहे.

या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या पशुधनाचा मृत्यू झाल्यास 24 तासाच्या आत विमा कंपनीला मोबाईल ॲप संकेतस्थळ ई-मेल फोन या द्वारे कळवणे आवश्यक राहील. विमा उतरवण्यासाठी पशुधनाचा बारा अंकी द्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन प्रणाली वरती नोंद करणे आवश्यक असणार आहे.

या योजनेअंतर्गत विमा कंपनीला पंधरा दिवसाच्या आत मध्ये थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे विम्याची रक्कम देणे बंधनकारक असणार आहे विलंब झाल्यास 12 टक्के व्याजदराने भरपाई द्यावी लागणार आहे.

पशुधन विमा योजना जीआर खालील लिंक वरती पाहू शकता.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान NLM)राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना (Livestock Insurance Scheme) राज्यात राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करणेबाबत…