राज्यातील बांधकाम कामगारासाठी राज्य शासनाची नवी योजना दोन पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजना. काय आहे योजना जाणून घेऊयात सविस्तर

Bandhkam Kamgar Scheme 2026
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना
- बांधकाम कामगारांचे पाल्य नववी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणाकरता शैक्षणिक सहाय्य योजना.
पात्रता निकष
या योजनेचा लाभ देत असताना यापूर्वी बांधकाम कामगाराच्या पाल्याला पहिले ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी साठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळाला असल्यास सदरच्या पाल्यास या योजनेतील लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभाकरता पाल्य नववी उत्तीर्ण झालेला असावा. उत्तीर्ण झालेल्या एक वर्षाच्या आत मध्ये या योजनेच्या लाभाकरता अर्ज करण्यासाठी अर्जदार पात्र राहील.
लाभ
या योजनेअंतर्गत सक्रिय बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना प्रतिपाल्य रुपये वीस हजार एवढी लाभाची रक्कम त्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
लागणारी कागदपत्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या पाल्याच्या नावे अर्ज केला जाईल त्या पाल्याचे आधार कार्ड पाल्याचे इयत्ता नववी मधील शाळेचे ओळखपत्र आणि पाल्य इयत्ता नववी मध्ये उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका अशा प्रकारची कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अकरावी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणाकरता सहाय्य योजना
पात्रता निकष
या योजनेच्या लाभासाठी सक्रिय बांधकाम कामगार नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे याचबरोबर पती-पत्नी दोघे बांधकाम कामगार असतील तर केवळ एकच लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत जर बांधकाम कामगाराच्या पाल्यांना पहिली ते सातवी किंवा इयत्ता आठवी ते दहावी किंवा दहावी ते इयत्ता बारावी अकरावी ते बारावी साठी दिले जाणाऱ्या अर्थसाहयाच्या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला असेल तर त्या पाल्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार नाही. या योजनेच्या लाभासाठी पाल्य इयत्ता अकरावी उत्तीर्ण झालेला असावा आणि तो उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत मध्ये हा अर्ज त्या लाभार्थ्याला करावा लागणार आहे.
लाभ
अकरावी उत्तीर्ण झाल्यास दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्याला प्रतिपाल्य 25 हजार रुपये इतक्या लाभाची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
लागणारी कागदपत्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराच्या पाल्याचे आधार ओळखपत्र पाल्याचे इयत्ता अकरावी मधील शाळेचे ओळखपत्र आणि पाल्य इयत्ता अकरावी मध्ये उत्तीर्ण झाल्या बाबतची गुणपत्रिका ही कागदपत्र सादर करावी लागतील .
- वैद्यकीय पदवी शैक्षणिक सहाय्य योजना
पात्रता निकष
या योजनेअंतर्गत सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना वैद्यकीय क्षेत्रामधील कोणत्याही पदवीकरता शिक्षण घेण्याकरता शैक्षणिक साह्य दिले जाणार असून यासाठी सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना लाभ दिले जातील.
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पती किंवा पत्नीला या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार नाही फक्त ही योजना सक्रिय नोंद असलेल्या बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी असणार आहे पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून नोंदीत असतील तर केवळ एकच लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ दिला जात असताना कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण वर्षाकरिता या योजनेच्या अंतर्गत सदर पाल्य लाभासाठी पात्र राहील वैद्यकीय क्षेत्रामधील पदवी पदवी तर पदवी पदवी तर पदविका अभ्यासक्रमासाठी मात्र ही योजना लागू राहणार नाही.
लाभ
वैद्यकीय पदवी सहाय्य योजना या योजनेअंतर्गत प्रतिपाल्य प्रति वर्ष एक लाख रुपये इतक्या लाभाची रक्कम बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
लागणारी कागदपत्र
वैद्यकीय पदवी सहाय्य योजना अंतर्गत लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये अर्ज केलेल्या पाल्याचे आधार ओळखपत्र पाल्य ज्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी करता आहे त्या महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र याचप्रमाणे मागील उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका अशा प्रकारचे कागदपत्र लागतील.
- अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजना
पात्रता निकष
या योजनेअंतर्गत सक्रिय बांधकाम कामगार नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाडल्यांना अभियांत्रिकी क्षेत्रामधील कोणत्याही पदवीकरता कोणत्याही शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण घेण्याकरता अभियांत्रिकी पदवी शैक्षणिक सहाय्य योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पती किंवा पत्नी ला लाभ दिला जाणार नाही याचबरोबर पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून नोंद येत असतील तर एक लाख अनुदेय राहणार आहे. अर्जदार पाल्या पदवीच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात अभियांत्रिकी क्षेत्रांमधील पदविका पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हे या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
लाभ
या योजनेअंतर्गत सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना प्रतिपाल्य प्रति वर्ष रुपये 60 हजार रुपये इतक्या लाभाची रक्कम त्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
लागणारी कागदपत्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पाल्याचे आधार ओळखपत्र पाले ज्या महाविद्यालयामध्ये पदवी शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाचे ओळखपत्र चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र याच प्रमाणे त्या पाल्याने उत्तीर्ण केलेली मागील वर्षाची गुणपत्रिका ही कागदपत्र आवश्यक राहणार आहेत.
- निवासी सैनिकी शाळा मधील शिक्षणाकरता शैक्षणिक सहाय्य योजना
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना.
पात्रता निकष
सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाडल्यांना निवासी सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरता शैक्षणिक सहाय्य योजना अंतर्गत बांधकाम कामगाराची पहिली दोन पाल्य या योजनेकडे पात्र राहतील. पती-पत्नी दोघे बांधकाम कामगार म्हणून नोंदीत असतील तर केवळ एक वेळचा लाभ मिळणार आहे. पाल्य कोणत्याही शैक्षणिक वर्षात असताना या योजनेच्या लाभाकरता अर्ज करू शकतो मात्र शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून अथवा कोणतेही कारणास्तव निवासी सैनिक शाळा सोडल्यानंतर त्या बांधकाम कामगाराच्या पाल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभ
निवासी सैनिक शाळा मधील शिक्षणाकरता शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या वर्षी पाल्य ज्या शैक्षणिक वर्षात असेल त्या शैक्षणिक वर्षापासून पाल्याच्या दरवर्षीच्या अभ्यासक्रम शुल्काची अर्थात ट्युशन फीची फीस पूर्णपणे दिली जाईल याकरता प्रत्येक वर्षी पाल्याच्या नावे अर्ज करावा लागेल.
लागणारी कागदपत्र
या योजनेच्या लाभासाठी बांधकाम कामगाराच्या अर्जदार पाल्याचे आधार ओळखपत्र पाल्याचे निवासी सैनिक शाळेचे ओळखपत्र आणि ज्या वर्षाच्या शिक्षण घेत असेल त्या शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
- शासन मान्यता प्राप्त अनुदानित व विना-अनुदानित सैनिक शाळा शैक्षणिक सहाय्य योजना
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या प्रतिपाल्यास एक वेळचा लाभ म्हणून रुपये दहा हजार रुपये इतक्या लाभाची रक्कम त्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
- परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. (PG & PhD) सहाय्य योजना
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराचा पाल्य जर परदेशी विद्यापीठामध्ये पीएचडीच शिक्षण घेत असेल तर त्या विद्यापीठाची शिक्षणशुल्काची रक्कम ही थेट विद्यापीठाकडे जमा केली जाईल तर केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रवास भत्ता किंवा इतर भत्ते हे त्या पाल्यांना दिले जाणार आहेत यासाठी प्रत्येक वर्षी केवळ 25 पाल्याची निवड केली जाईल.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्याला योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड पदवी घेत असलेल्या कॉलेजचे ओळखपत्र पदवी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका अशा प्रकारचे कागदपत्र सादर करावी लागतील.
याचप्रमाणे महामंडळाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना या योजनेचा देखील समावेश केलेला आहे.
या योजनेअंतर्गत सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांच्या पहिली ते आठवीच शिकणाऱ्या पाल्यांना शासनाच्या खरेदी धोरणानुसार बेसिक आ*** किट अर्थात मूलभूत वस्तू संच खरेदी करून दिला जाणार आहे.


