Shetkari Karjmukti जिल्ह्यातील 29 हजार 409 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 29409 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड, लवकरच कर्जमाफीचा लाभ Shetkari karjmukti

Shetkari Karjmukti

Shetkari Karjmukti Yojana 2026

गेल्या काही वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे.

या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी सहकार विभागाच्या माध्यमातून सर्व बँकांना निर्देशित करण्यात आलेले आहे याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वरती अपलोड करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे.

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 29 हजार 650 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे ऑडिट करण्यात आलेले असून यापैकी 29409 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती पोर्टल वरती अपलोड करण्यात आलेली आहे.

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या प्रगती अहवालानुसार उर्वरित असलेल्या 241 खात्यापैकी एक हजार रुपयापेक्षा कमी रक्कम असलेले खाते याच प्रमाणे मयत कर्जदाराची खाती व आधार डाटा उपलब्ध नसलेली खात्याचा समावेश आहे.

उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी आधार व कर्जदार मयत असल्यास वारसाच्या संदर्भातील माहिती बँकेमध्ये सादर करण्याचं आवाहन करण्यात आला आहे.