MahaDBT Seed Lottery 2026 खरीप हंगाम 2026 करता अनुदानित बियाण्याच्या वितरणाकरता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी प्रकाशित करण्यात आली आहे; पाहुयात यादी ऑनलाइन कशी पहायची.

MahaDBT Seed Lottery 2026
यामध्ये प्रमाणित बियाण्याच्या वितरणाकरता अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या लाभार्थ्यांची महाडीबीटी बियाणे सोडत प्रकाशित करण्यात आलेले आहे. महाडीबीटी बियाणे सोडत यादी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
प्रमाणित बियाण्याच्या वितरणाची यादी पाहण्याकरता सर्वात प्रथम शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावरती यायचे आहे. याची लिंक खाली दिली आहे.
MahaDBT Home Page Link – https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
या लिंक वरती ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज खुलेल ज्यामध्ये आपल्याला अर्जाची सद्यस्थिती स्थिती, वितरित लाभार्थी यादी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळेनुसार यादी याचबरोबर महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य निवड यादी अशा वेगवेगळ्या ऑप्शन दिसतील.
यामधील चार नंबरचे ऑप्शन महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
याच्यानंतर आपल्याला पुढे बाब प्रकार निवडण्यासाठी सांगितलं जाईल या बाब प्रकार निवडा मध्ये आपल्याला बियाणे औषधे व खते ही बाब निवडायचे आहे ही बाब निवडल्यानंतर आपण ज्या जिल्ह्याची यादी पाहणार आहात त्या जिल्ह्याचे नाव निवडायचे त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या तालुक्याचे नाव निवडायचे ज्या गावाच्या आपल्याला यादी पाहिजे ते गाव याच्यामधून आपल्याला निवडायचे आहे व शोधा वरती क्लिक करायचे आहे.
आपल्याला आपल्या गावामध्ये बियाणे वितरणाच्या अनुदानाकडे पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी दाखवली जाईल ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव त्याच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या बियाण्याचे नाव आणि त्याच्यासाठी मंजूर असलेली प्रस्तावित रक्कम अशा बाबी आणि शेतकऱ्यांनी अर्ज केलेली तारीख या सर्व बाबी यामध्ये पाहता येणार आहेत.
यामध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून संपर्क केला जाईल व लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बियाण्याचे वितरण केलं जाणार आहे.
आपले जर नाव या यादीत असेल तर आपण देखील आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधून आपल्या बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता.


